• Fri. Jun 5th, 2026

    ’58 लाख कुणबी नोंदी सापडल्या, 12 लाख प्रमाणपत्र दिले’, विखे पाटलांकडून Manoj Jarange यांची मनधरणी

    ’58 लाख कुणबी नोंदी सापडल्या, 12 लाख प्रमाणपत्र दिले’, विखे पाटलांकडून Manoj Jarange यांची मनधरणी

    जालना : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्यापासून पुन्हा उपोषणाला बसण्याच्या तयारीत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी 30 मे पासून म्हणजेच उद्यापासून भर उन्हात उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. तसेच उपोषण सुरु केल्यापासून पाण्याचा एक थेंबही घेणार नाही, असा मोठा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मनोज जरांगे यांच्या या इशाऱ्यानंतर राज्य सरकारदेखील सतर्क झालं आहे. मनोज जरांगे यांचं उपोषण हे सरकारला परवडणारं नसेल. त्यामुळे मनोज जरांगे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

    मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्यासह सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी गेलं आहे. सरकारच्या शिष्टमंडळाकडून मनोज जरांगे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत काय-काय उपाययोजना करण्यात आल्या, याबाबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माहिती दिली. तसेच शिंदे समिती स्थापन केल्यापासून राज्यात 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या. त्यापैकी 12 लाख प्रमाणपत्र देण्यात आले, अशी माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

    मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यात 3 लाख 8 हजार 898 लोकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी 3 लाख 251 लोकांना तातडीने दाखले मिळाले आहेत. नाकारल्यांची संख्या 427 आहेत. शिंदे समिती स्थापन झाल्यापासून स्थापन झाल्यापासून मराठवाड्यात आमच्याकडून 61 हजार 230 प्रमाणपत्र वितरित करण्यात आली आहेत. काही जिल्ह्यांमध्ये काम कमी आहे. धाराशिव, परभणी, हिंगोलीमध्ये काम कमी आहे. सर्वाधिक काम बीड जिल्ह्यात आहे, अशी माहिती विखे पाटील यांनी दिली.

    शिंदे समिती स्थापन केल्यापासून ७ सप्टेंबर २०२३ पासून १९ मे २०२६ अखेर राज्यामध्ये वितरित दाखले १२ लाख ९६ हजार आहेत. त्यामध्ये मराठ्यातील वितरित दाखल्याची संख्या ही 3 लाख 251 इतकी आहे. एकूण 961 गुन्हे दाखल झाले होते. यामध्ये 827 गुन्हे मागे घेण्याची शिफारस आहे. तर 64 गुन्हे आपण मागे घेऊन शकत नाहीत, असं विखे पाटील यांनी स्पष्ट केलं.

    मनोज जरांगे काय म्हणाले?

    “मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला आता तीन वर्षे होत आहेत. हे आंदोलन सुरु झाल्यापासून महाराष्ट्रात किती नोंदी सापडल्या आहेत?”, असा सवाल मनोज जरांगे यांनी केला. त्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिंदे समितीच्या शिफारसीनुसार 58 लाख नोंदी सापडल्याचं सांगितलं. त्यावर मनोज जरांगे यांनी शिंदे समिती स्थापन झाल्यापासूनच नोंदी शोधल्या का? असा प्रतिप्रश्न केला. त्यावर विखे पाटील यांनी समितीच्या शिफारशीवरच 12 लाख दाखले दिले.

    “शिंदे समिती स्थापन केल्यापासून 58 लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यावर खुलासा झाला पाहिजे”, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली. यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी 58 लाख नोंदी सापडल्या आहेत. पण 12 लाखांपेक्षा जास्त प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहेत, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

    “सरकारने 58 लाख नोंदी सापडल्याची माहिती अपलोड केली होती. सरकारने आमची मधल्या काळात फसवणूक काय केली की, त्यांनी अपलोड केलेली माहिती उडवून टाकली. तो डाटा माझ्याकडे होता”, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. त्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी “सरकारने डेटा उडवला नाही. सरकार कशाला लपवेल?”, असा सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. त्यावर मनोज जरांगे यांनी सरकारने मराठीतून लिहिलेली माहिती उडवली आणि मोडी लिपीत माहिती राहू दिली, असं मनोज जरांगे म्हणाले.

    “57 लाख 41 हजार कुणबी नोंदी सापडल्या अशी माहिती सरकारने मला दिली. ही तुम्ही दिलेली माहिती आहे. या नोंदी कुठे गेल्या? विखे पाटील यांनी 58 लाख नोंदी सापडल्याची लेखी माहिती दिली. आमच्याकडे सगळी माहिती आहे. सरकारनेच दिलेली लेखी आश्वासने आहेत”, असं मनोज जरांगे पाटील यांनी दिली. “58 लाख नोंदींपैकी 12 लाख प्रमाणपत्र वितरीत केले”, अशी माहिती विखे पाटील यांनी दिली. यावेळी मनोज जरांगे यांनी सर्व 58 लाख नोंदींची नावे आणि 12 लाख वितरित केलेले प्रमाणपत्र यांची यादी द्या, अशी मागणी केली.

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed