Pimpri Chinchwad Poisonous Liquor Case : एक्साईज विभागाला याबाबत आधी माहिती नव्हती का? दापोडी पोलिसांना या प्रकाराची कल्पना नव्हती का? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. या प्रकरणात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे.
पिंपरी चिंचवड विषारी दारू मृत्यू प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारुमुळे झालेल्या मृत्युंमुळे संपूर्ण शहरच हादरून गेलं आहे. एकामागून एक सुरू 13 जणांच्या मृ्त्युमळे परिसरात शोककळा पसरली आहे. आनंदवन, काटेवस्ती, संजयनगर, आझाद चौक आणि जय महाराष्ट्र चौक या परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, परिसरात भीतीचं वातावरण आहे. तर विषारी दारूमुळे एकाच घरातील दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. विषारी दारुमुळे पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडीतील विजय राठोड आणि विजु राठोड या दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झालाय. विजय आणि राजू राठोड हे दोघांचीही मुलं लहान आहेत. त्यांचं कुटुंब या दारुकांडामुळे अक्षरश: उघड्यावर आलं आहे.
दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
दोघांच्या पत्नी सारिका राठोड आणि संगीता राठोड या दोघींनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं की, ‘घरातील कमावते पुरुष गेले, आता मुलांना कसं मोठं करायचं?’, असा आक्रोश पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडीतील राठोड कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. विषारी दारूमुळे विजय राठोड आणि विजू राठोड या दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. विजय आणि विजू या दोघांचीही मुलं अजून लहान आहेत.
कुटुंब अक्षरशः उघड्यावर
या दुर्घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर मोठं संकट कोसळलं असून कुटुंब अक्षरशः उघड्यावर आलं. पती गमावल्याचं दुःख आणि पुढील आयुष्याची चिंता व्यक्त करताना पत्नी सारिका आणि संगीता राठोड यांना अश्रू अनावर झाले. ‘आता मुलांचं शिक्षण, घरखर्च कसा चालवायचा?’ असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. प्रशासनाने दोषींवर कठोर कारवाई करावी आणि कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. या संपूर्ण घटनेनंतर फुगेवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.
नेमकं प्रकरण काय?
आधी फुगेवाडी येथील सहा मृतांपैकी चार जणांचा मृत्यू हा हृदयविकारासह इतर कारणांमुळे झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत होतं. मात्र, या सर्वांचा मृत्यू केमिकलयुक्त दारु प्यायल्याने झाला असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या प्रकरणात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, फुगेवाडी आणि हडपसरमधील काळेपडळ परिसरात स्पिरिट म्हणजेच केमिकलयुक्त दारू पुरवणाऱ्या योगेश वानखेडे याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश वानखेडे हा केमिकलयुक्त गावठी दारू तयार करण्याचा व्यवसाय करत होता. दोन दिवसांपूर्वी त्याने फुगेवाडी आणि काळेपडळ परिसरात ही दारू पुरवल्याचं समोर आलं आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा