Maratha Reservation Manoj Jarange Patil Hunger Strike: मराठा समाजाचे मन जिंकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संधी आहे. त्यांनी आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात, असे मनोज जरांगे म्हणाले.
‘आता फक्त अंमलबजावणी पाहिजे. चर्चा करणार नाही. हैदराबाद, सातारा गॅझेट लागू करावे. १९९० आणि १९९४ मध्ये जसे ओबीसी आरक्षण दिले; तसेच मराठा समाजाला आरक्षण द्यावे. तीच नियमावली लागू करावी. १९६७पासून आतापर्यंत मराठा समाजाचे नुकसान होत आहे. आमचा अनुशेष कोण भरून काढणार. आमच्या पाच पिढ्यांचे नुकसान झाले आहे. कुणबी आणि मराठा एकच आहेत. असा सरकारचा आदेश काढा. आता आरपारची लढाई आहे,’ असे जरांगे या वेळी म्हणाले.
Sanjay Shirsat | संजय राऊतांचा जीव ना ठाकरे ना पवारांमध्ये मग कुणामध्ये? शिरसाट स्पष्टच बोलले
‘आता फोनवरून चर्चा नाही. खूप वेळ दिला. जीआर काढला, तर ५८ लाख नोंदी सापडल्या. व्हॅलिडिटीसाठी अर्ज केले आहेत. बलिदान दिलेल्या कुटुंबांना नोकरी देण्याची आणि निधी देण्याची मागणी केली आहे. ओबीसींनी न मागता त्यांना मंत्रालय दिले; आता आम्ही मराठा-कुणबी मंत्रालय मागत आहोत, तर ते देत नाहीत,’ असेही जरांगे यांनी या वेळी सांगितले.
‘मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व आमदार प्रसाद लाड येणार आहेत हे आपल्याला माहीत नाही. अजित पवार व एकनाथ शिंदे यांचे मंत्री गरिबांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अंतरवाली सराटीला येतात; म्हणून त्यांना टार्गेट केले जाते.
Eknath Shinde: मनोज जरांगेंनी पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलं, शिंदेंनी सरकारची भूमिका मांडली; मराठा आरक्षणावर काय म्हणाले?
या वेळी आपण कठोर आणि कडक आमरण उपोषण होणार आहोत. उन्हात एका बाजेवर बसून, उघड्यावर उपोषण करणार आहोत. पायात चप्पल घालणार नाही. डोक्यावर मंडप नसेल. पाणी पिणार नाही. जीवाची लाही लाही झाली, तरी आपण उठणार नाही. मराठा समाजाने अंतरवाली सराटीत येऊ नये. –मनोज जरांगे-पाटील, मराठा आरक्षण आंदोलक
Adhik Maas 2026 : जावयाची हौस सासऱ्याने पुरवली! धोंडे जेवणाला दिली चक्क घोडी
मुख्यमंत्री-जरांगेंनी चर्चेतून तोडगा काढावा- रामदास आठवले
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे यांनी घेतलेल्या आंदोलनाच्या पवित्र्यावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जरांगे यांची बैठक झाल्यास नक्कीच यावर तोडगा निघेल’, असे सांगितले. त्यामुळे या दोघांची एकत्र बैठक व्हावी, असा सल्ला आठवले यांनी दिला.
