प्रशांत आहेर, पुणे: कात्रज ते येरवड्यादरम्यानच्या भूमिगत रस्त्याचा आराखडा अंतिम टप्प्यात पोहोचला असून, जमिनीवरील दुहेरी उड्डाणपुलाप्रमाणेच भूगर्भात दोन स्तरांचा भूमिगत मार्ग (डबल डेकर ट्विन टनेल) निर्माण करण्याची योजना तयार आहे. येरवडा-कात्रजसह एकूण ५४ किलोमीटरच्या भुयारी रस्त्यासांठी ३६,४१५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ५४ हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागेल, असा प्राथमिक अंदाज आहे. या भुयारी मार्गांमध्ये आपत्कालीन स्थितीत सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी पर्यायी मार्गांचा विचार (एस्केप रूट) असतील.
माहिती सरकारकडे सादर
‘मोनार्क सर्व्हेअर्स अँड इंजिनीअरिंग कन्सल्टन्सी’ यांनी तयार केलेल्या या आराखड्यात वाहतुकीची सद्यस्थिती, भविष्यात होणारी वाहतूक वाढ, बोगद्याचे पर्याय, आर्थिक व्यवहार्यता आणि निधीची उपलब्धता यावर सविस्तर विश्लेषण करण्यात आले आहे. ही सर्व माहिती राज्य सरकारला सादर करण्यात आली असून, या प्रकल्पासाठी विशेष उद्देश वहन (एसपीव्ही) स्थापना करण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणूक प्रचारात केलेल्या घोषणेनंतर या भुयारी मार्गांसाठी एकेक पाऊल पुढे टाकले जात आहे.
Pune Ring Road: सिंहगड किल्ल्याजवळ बोगदा, खडकवासलावर पूल, पुण्यात बाह्य रिंग रोडच्या कामांना वेग; पश्चिम बायपासमुळे फायदा होणार
सल्लागार संस्थेने या अभ्यासासाठी पुण्यातील ४५ ठिकाणी २४ तास वाहनांची मोजणी, वळण घेणाऱ्या वाहनांची संख्या, प्रवास चालू आणि प्रवास बंद होणारी प्राधान्याची ठिकाणे, अशा विविध प्रकारची सर्वेक्षण केली आहेत. त्यावर आधारित ‘ट्रॅफिक मॉडेलिंग’ करण्यात आले. वैभव टॉकीज-हडपसर, हॅरिस ब्रिज, शनिवारवाडा, गणेशखिंड रस्ता, खराडी बायपास यांसारख्या ठिकाणी प्रचंड वाहतुकीचा ताण असल्याचे या अभ्यासात आढळले आहे. सल्लागार संस्थेने केलेल्या अभ्यासात सात संभाव्य बोगद्यांचा विचार करण्यात आला आहे. त्यापैकी ‘येरवडा-खडी मशिन’ हा उत्तर-दक्षिण पुण्याला जोडणारा प्राधान्य मार्ग म्हणून निश्चित केला आहे. त्याशिवाय, ‘जगताप डेअरी-सिंहगड रस्ता’ आणि ‘येरवडा-हिंजवडी’ हे मार्गही प्रस्तावित आहेत.
अवघ्या सात मिनिटांत प्रवास
या अहवालानुसार, बोगद्यांच्या जाळ्यामुळे रस्त्यांवरील वाहतुकीत १५ ते २२ टक्के घट होईल, असा दावा करण्यात आला आहे. येरवडा ते हिंजवडी हा सध्याचा ७५ मिनिटांचा प्रवास केवळ १६ मिनिटांत पूर्ण होऊ शकतो. तर, जगताप डेअरी ते कोथरूड हा प्रवास ६५ मिनिटांवरून अवघ्या सात मिनिटांवर येईल, असे नमूद करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी १७.६ मीटर व्यासाचा ‘डबल डेकर टनेल’ सुचविण्यात आला असून, एकाच बोगद्यात दोन्ही दिशेची वाहतूक सुरू ठेवता येणार आहे. त्यामुळे भूसंपादन कमी होईल आणि पर्यावरणीय परिणामही मर्यादित राहतील, असेही नमूद आहे.
Virar-Alibaug Corridor: अभयारण्यातून ‘विरार-अलिबाग कॉरिडोर’चा मार्ग; 5,043 खारफुटी बाधित होणार; नवा आराखडा सादर
अहवालानुसार हा प्रकल्प ‘बांधा वापरा हस्तांतरित करा’ (बीओटी) पद्धतीने राबविण्याचा विचार असून, ४० वर्षांचा कालावधी प्रस्तावित आहे. हा निधी इक्विटी, कर्ज आणि सरकारी अनुदानाद्वारे उभा करण्याचे ‘मॉडेल’ अहवालात सुचविण्यात आले आहे. मात्र, हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ३७ टक्के ‘व्हायबिलिटी गॅप फंडिंग’ आवश्यक आहे, असेही अहवालात म्हटले आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा