आंबेनळी घाटात घडलेल्या अपघाताच्या घटनेमुळे संपूर्ण राज्य हळहळलं आहे. या अपघातात आठ तरुणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर पुन्हा एकदा आंबेनळी घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवशांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर चर्चा होत आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमुलकुमार जैन, रायगड : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि रायगड जिल्ह्यातील पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात सातारा जिल्ह्यातील आठ मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर हा घाट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या दहा वर्षांत या घाटात अनेक छोटे-मोठे अपघात घडले आहेत. वाहने खोल दरीत कोसळून अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या घाटातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा आंबेनळी घाट हा महत्त्वाचा मार्ग मानला जातो. मात्र गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामांच्या संथ गतीमुळे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. अनेक ठिकाणी अर्धवट कामे, खोदून ठेवलेले रस्ते, अरुंद झालेले मार्ग, संरक्षण कठड्यांचा अभाव आणि धोकादायक वळणे यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरुवातीला या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी १५ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर दीड वर्षापूर्वी हा प्रकल्प महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एमएसआयडीसी) कडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर पोलादपूर ते प्रतापगडाच्या पायथ्यापर्यंतच्या सुमारे २४ किलोमीटर मार्गासाठी १०० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली.
एमएसआयडीसीचे कार्यकारी अभियंता दिलीप हिंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पात रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण, संरक्षण कठडे उभारणे, पाणी वाहून जाण्यासाठी नाले बांधणे, मोऱ्यांची दुरुस्ती, पुलांची पुनर्बांधणी तसेच दरडी कोसळण्याचा धोका कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. ही सर्व कामे मे २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र आगामी पावसाळ्यामुळे कामाच्या गतीवर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे.
आंबेनळी घाट हा भौगोलिकदृष्ट्या अत्यंत दुर्गम, तीव्र उतार आणि नागमोडी वळणांनी भरलेला आहे. घाटात अनेक ठिकाणी ब्लाइंड टर्न असल्याने समोरून येणारी वाहने शेवटच्या क्षणापर्यंत दिसत नाहीत. त्यातच पावसाळ्यातील दाट धुके आणि निसरडा रस्ता वाहनचालकांसाठी मोठे आव्हान ठरतात. त्यामुळे येथे वारंवार अपघात होत असल्याचे चित्र आहे.
२८ जुलै २०१८ रोजी या घाटात दापोली कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची बस खोल दरीत कोसळून ३३ जणांचा मृत्यू झाला होता. या भीषण दुर्घटनेनंतरही घाटातील अपघातांची मालिका थांबलेली नाही. त्यामुळे घाटातील कामांचा वेग वाढवून प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा