• Fri. Jun 19th, 2026

    स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी समन्वयातून प्रभावी यंत्रणा उभारा – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    May 27, 2026
    स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी समन्वयातून प्रभावी यंत्रणा उभारा – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद

    मुंबई, दि. २७ : पीसीपीएनडीटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासनाचे कठोर धोरण आहे.  या कायद्याच्या व्यापक प्रसार, प्रचार व अंमलबजावणीत राज्य तपासणी व संनियंत्रण समितीच्या सदस्यांनी आवश्यक सहकार्य व मार्गदर्शन करून समन्वयातून प्रभावी यंत्रणा उभारली जावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

    आरोग्य भवन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्य तपासणी व संनियंत्रण समितीची बैठक झाली. बैठकीस आमदार स्नेहा दुबे, प्रधान सचिव निपुण विनायक, अतिरिक्त संचालक डॉ. संदीप सांगळे, उपसंचालक (विलटो) डॉ. दिगंबर कानगुले, सहाय्यक संचालक डॉ. वैशाली बडधे व समितीचे सदस्य उपस्थित होते.

    मंत्री आबिटकर म्हणाले, पीसीपीएनडीटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील सर्व संबधित यंत्रणांमध्ये योग्य समन्वय निर्माण करून त्याचा उपयोग मूळ उद्देश साध्य करण्यासाठी करावा, यासाठी स्वतंत्र ‘डेडिकेटेड टीम’ आणि ‘डेडिकेटेड यंत्रणा’ नियुक्त करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

    यासाठी  ठरविलेली कार्यपद्धती प्रभावीपणे राबविणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

    मंत्री अबिटकर म्हणाले, समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय असल्याने  लोकप्रतिनिधींनी आपल्या कार्यक्षेत्रात वेळ देऊन या मोहिमेत सहभागी झाल्यास या कामाला वेग येईल. यासाठी सर्वांनी जबाबदारीने योगदान द्यावे. समिती सदस्यांनी सुचवलेल्या सूचनांचा विचार केला जाईल, असेही मंत्री आबिटकर यांनी सांगितले.

    ००००

    एकनाथ पोवार/स.सं

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed