• Sat. Jun 6th, 2026
    Eknath Shinde : ‘कांदा प्रश्नावर उद्या दिल्लीत हाय व्होल्टेज बैठक’, तर सपकाळांवर संताप, ‘भाई’ गरजले

    मंत्रालयातील बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी कांदा प्रश्नाबाबत अतिशय महत्त्वाची माहिती दिली. तसेच त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर प्रचंड टीका केली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या शब्दांत टीका केल्यानंतर उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे चांगलेच संतापले. त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या टीकेचा निषेध केला आहे. तसेच हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार असल्याचं प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. “हर्षवर्धन सपकाळ हे आता जेमतेम एक दीड वर्ष काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री होते. 12 वर्ष या देशाचे यशस्वी पंतप्रधान म्हणून काम केलं आणि या देशाला पुढे नेण्याचं काम केलं. देशाचं विकासाचं, आर्थिक महासत्तेचं, आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याचं काम केलं आहे. त्यांनी एक दिवसही सुट्टी घेतली नाही. देश प्रथम हा संकल्प त्यांनी केला. देशाच्या अशा या यशस्वी पंतप्रधान मोदींवर अशा प्रकारच्या खालच्या दर्जात टीका करणं हे निंदनीय आहे. आम्ही त्याचा निषेध करतो”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

    “खरं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासाचे धुरंदर आहेत आणि ज्यांनी आरोप केला, ते असली दलिंदर आहेत. हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे. कहाँ राजा भोज और कहाँ गंगू तेली असा प्रकार आहे. याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. या देशाची 140 कोटी जनता काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही”, असा घणाघात एकनाथ शिंदे यांनी केला. “ही संस्कृती नाही. देशाच्या पंतप्रधानांना अशाप्रकारचं वक्तव्य करणं ही सस्कृती नाही. त्यामुळे याची निंदा केली तेवढी कमी आहे”, अशीदेखील टीका एकनाथ शिंदे यांनी केली.

    कांदा प्रश्नावर उद्या दिल्लीत बैठक

    दरम्यान, कांदा प्रश्नाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी हलावदील झाले आहेत. कांद्याला भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सरकारने आता 15 रुपये 80 पैसे इतक्या दरात कांदा खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. पण इतक्या किंमतीत भागणार नाही, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. यामुळे आता कांदा प्रश्नावर थेट दिल्लीत हाय व्होल्टेज बैठक होणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

    “कांदा प्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांची उद्याच बैठक बोलावली आहे. या बैठकीत कांदा प्रश्नावर निर्णय होईल. राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून कांदा खरेदी केंद्र सुरु झाले आहेत. 15 रुपये 80 पैसे दराने कांदा खरेदी केला जातोय. शेतकऱ्याला राज्य आणि केंद्र सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहील”, असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिली.

    “विरोधकांकडे सरकार विरोधात कोणतेही मुद्दे नाहीत. ते आता प्रसिद्धीसाठी आंदोलन करत आहेत. हे सगळं स्टंट आहे. काँग्रेसच्या युपीएच्या सरकारनेदेखील कांद्याने जनतेला रडवलं होतं. पण त्यांनी भाव वाढवून दिले नाही. याउलट आज राज्य आणि केंद्र सरकार मिळून 15 रुपये 80 पैसे दराने कांदा खरेदी होतोय. उद्या अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीतही सकारात्मक निर्णय होईल. यामुळे कांदा उत्पादकांच्या पाठिशी राज्य आणि केंद्र दोन्ही सरकार ठामपणे उभे आहे”, असंदेखील एकनाथ शिंदे म्हणाले.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा