• Sat. Jun 6th, 2026

    Pune Crime: पुण्यात आयटीमधील तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकराला अटक; प्रेमसंबंधांतील वादानंतर निकितासोबत काय घडलं?

    Pune Crime: पुण्यात आयटीमधील तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकराला अटक; प्रेमसंबंधांतील वादानंतर निकितासोबत काय घडलं?

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: काही दिवसांपूर्वी मुंढवा पुलावरून मुळा-मुठा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या करणाऱ्या तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी खराडी पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. ही तरुणी आयटी क्षेत्रात कार्यरत होती. प्रेमसंबंधातून सुरू झालेला वाद आणि त्यानंतरचा मानसिक त्रास यातून तिने हे पाऊल उचलल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी चैतन्य संजय कानडे (वय २३, रा. वडगाव शेरी) याला अटक केली असून, तरुणीच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    निकिता (वय २३, सध्या रा. सिद्धीविनायक पीजी, खराडी, मूळ रा. वैराग रस्ता, ता. माढा, जि. सोलापूर) काही काळापासून खराडी परिसरात राहत होती. तिने ५ मे रोजी दुपारी मुंढवा पुलावरून मुळा-मुठा – नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. सुरुवातीला या घटनेची अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली. मात्र, तपासात चैतन्य निकिताचा नातेवाइक असल्याचे निष्पन्न झाले.

    सततच्या त्रासाला कंटाळून निकिताने टोकाचे पाऊल उचलल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीनंतर खराडी पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलिस उपनिरीक्षक माधुरी बिडवे तपास करीत आहेत.

    तरुणीसोबत नेमकं काय घडलं?

    मुंढवा येथील नवीन पुलावरून नदीपात्रात उडी मारून ५ मे रोजी कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या २२ वर्षीय निकिताने आत्महत्या केली. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि जीवरक्षकांनी तिचा शोध घेऊन मृतदेह बाहेर काढला. या प्रकरणी खराडी पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती. निकिता अष्टेकर (वय २२, मूळ रा. म्हाडा, जि. सोलापूर) असे सदर तरुणीचे नाव आहे. निकिता येरवडा येथील एका कॉल सेंटरमध्ये कार्यरत होती. ५ मे रोजी दुपारी ती मुंढवा येथील नवीन पुलावर आली. तेथून तिने नदीत उडी मारली. ही घटना लक्षात येताच नागरिकांनी तत्काळ नदीत उतरून तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र शोध लागला नव्हता. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. ५ मे रोजी उशिरापर्यंत शोधकार्य सुरू ठेवण्यात आले; मात्र काहीच निष्पन्न झाले नाही. दुसऱ्या सकाळी पुन्हा शोधमोहीम राबविण्यात आली आणि दुपारी सुमारे एकच्या सुमारास नदीतून तरुणीचा मृतदेह काढण्यात आला.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed