• Sun. Jun 14th, 2026
    Satara Asgaon : पोटच्या लेकरांना बघण्यासाठी माऊलींचा हंबरडा, आसगावमध्ये प्रचंड आक्रोश; लहानपणी सोबत खेळलेले सवंगडी शेवटच्या प्रवासाला एकत्रच निघाले

    Satara Asgaon 5 Youth Died in Ambenali Ghat Accident : साताऱ्याच्या आसगावमधील पाच तरुणांचा आंबेनळी घाटात भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर आसगावमध्ये शोककळा पसरली आहे.

    आंबेनळी घाट अपघात आठ तरुणांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सातारा : रायगडच्या पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात एक भीषण अपघात झाला. ही हृदयद्रावक घटना आज पहाटे समोर आली आहे. आंबेनळी घाटात भीषण अपघात होऊन स्कॉर्पिओ तब्बल 1000 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात 8 तरुणांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातात सातारा तालुक्यातील आसगाव गावातील पाच तरुणांचा करुण अंत झाला आहे. हे पाचजण एकाच गावातील एकाच गल्लीत राहणारे होते. त्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. आसगावातील प्रत्येक घरात रडण्याचा आवाज ऐकू येत आहेत. महिलांचा हंबरडा, माय-माऊलींचा आक्रोश, नातेवाईकांचा आक्रोश आणि सुन्न झालेली गावकऱ्यांची मनस्थिती, हे दृश्य अत्यंत हृदयद्रावक आहे. आज गावात कुणाच्याच घरात चूल पेटलेली नाहीय.

    रस्त्याला संरक्षण कठडे नसल्यामुळं दुर्दैवी घटना

    मात्र, गावातील गावकरी आणि या कुटुंबातील सदस्यांनी या घटनेमध्ये शासनाला जबाबदार धरलं आहे. रस्त्याला संरक्षण कठडे नसल्यामुळं ही दुर्दैवी घटना झाल्याची भावना व्यक्त केली आहे. त्याच पद्धतीने मृत्यू झालेल्या तरुणांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार शासनाने द्यावा, अशी अपेक्षा देखील यावेळी बोलत असताना व्यक्त केली आहे. अपघातग्रस्त तरुणांमध्ये पाचजण तरुण हे आसगाव, ता. सातारा, जि. सातारा येथील रहिवासी असून 2 युवक मर्ढे या गावातील असून 1 तरुण हा पण खटाव येथील आहे. मृतांमध्ये महेश अनिल पवार (वय 25), आदित्य अशोक साळुंखे (वय 21), रितेश राजेंद्र लोखंडे (वय 25), सुहास जितेंद्र लोखंडे (वय 20), अंश समीर चव्हाण (वय 18), उत्कर्ष आनंद शिंगटे (वय 21), अनिल अभिमन्यू शिंगटे (वय 35 ) आणि नितीन किसन नायकोंडे (वय 35) या तरुणांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे, या तरुणांपैकी काल महेश अनिल पवार (वय 25) या तरुणाचा वाढदिवस होता.
    Maharashtra TimesPune Crime NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरण; पुण्यातील मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये तो ‘गॉड’ कोण? मोठी अपडेट समोर

    स्कार्पिओ कारचा चेंदामेंदा

    आंबेनळी घाटातील दरीत कोसळेली कार (क्र. MH 11 DN 2340) ही सातारा जिल्ह्यातील आसगाव (ता. कोरेगाव) येथील आहे. खोल दरीत कार कोसळल्याने सर्व तरूण जागीच ठार झाले असून स्कार्पिओचा चेंदामेंदा झाला आहे. सध्या मृतदेह दरीतून वर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महाबळेश्वर ते पोलादपूर दरम्यान असलेल्या आंबेनळी घाटात हा अपघात घडला.

    वीकेंडला पर्यटनाचा आनंद घेऊन कोकणातून पुन्हा साताऱ्याकडे परतत असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आज सोमवारी सकाळीही शोध व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू ठेवण्यात आले असून, घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिक, नातेवाईक आणि स्थानिक प्रशासन उपस्थित आहे. वाहनापर्यंत पोहोचण्यासाठी बचाव पथकांकडून विशेष तांत्रिक उपकरणांचा वापर करण्यात येत आहे.
    Maharashtra TimesAmbenali Ghat Scorpio Accident : स्कॉर्पिओचा अक्षरश: चक्काचूर झाला, 1000 फूट दरीत तरुण बेवारस पडलेले; आंबेनळी घाटातील भयावह दृश्य समोर

    मोबाईल लोकेशनवर अपघाताची माहिती

    दरम्यान, पर्यटनासाठी आलेल्या युवकांशी कोणताही संपर्क होत नसल्यानं मृत्यू पावलेल्या आठ जणांपैकी अंश चव्हाणच्या वडिलांनी फोन करून या घटनेची माहिती पोलादपूर पोलिसांना दिली. त्यानंतर मोबाईल लोकेशनवर सर्च केल्यानंतर हा अपघात झाल्याचं कळलं, अशी माहिती आता समोर येत आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा