• Mon. Jun 15th, 2026

    मत्स्यव्यवसाय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना माहिती पुस्तिका २०२६ – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    May 25, 2026
    मत्स्यव्यवसाय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना माहिती पुस्तिका २०२६ – महासंवाद


    मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने ‘मत्स्यव्यवसाय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना माहिती पुस्तिका २०२६’  नुकतीच प्रकाशित करण्यात आली. सदर पुस्तिकेमध्ये मत्स्यव्यवसाय विभागाच्या ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना’ तसेच केंद्र शासनाच्या विविध योजनांतर्गत उपलब्ध आर्थिक सवलतींची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या पुस्तिकेमुळे सामान्य मच्छीमार, मत्स्यसंवर्धक तसेच मच्छिमार सहकारी संस्थांना योजनेची माहिती सुलभपणे मिळून त्याचा लाभ घेण्यास प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा आहे.

    राज्य शासनाने ‘विकसित महाराष्ट्र – विकसित भारत २०४७’ हे दीर्घकालीन ध्येय निश्चित केले असून, त्या अनुषंगाने मत्स्यव्यवसाय विभागाने प्रस्तावित केलेल्या विविध योजना सामाजिक व आर्थिक परिणाम लक्षात घेऊन तयार करण्यात आल्या आहेत. या योजनांमध्ये कार्यक्षम अंमलबजावणी, विपणनपूर्व धोरण, महसूलवाढ तसेच पर्यायी गोड्या पाण्यातील स्रोतांची ओळख अशा महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश आहे. यामुळे ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ हे उद्दिष्ट साध्य करण्यास तसेच मच्छीमारांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्यास मदत होईल.

    येथे वाचा सविस्तर माहिती पुस्तिका 👇🏻
    https://drive.google.com/file/d/1O99IsdeqMm1k4FjQXOdAmHIM9F77hnkZ/view?usp=sharing
    000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed