• Sat. Jun 6th, 2026

    26 ऐवजी 28 मे रोजी केरळमध्ये मान्सूनचे आगमन? महाराष्ट्रातही प्रतीक्षा कायम, हवामान विभागाचा ताजा अंदाज

    26 ऐवजी 28 मे रोजी केरळमध्ये मान्सूनचे आगमन? महाराष्ट्रातही प्रतीक्षा कायम, हवामान विभागाचा ताजा अंदाज

    IMD Weather Update on 25th May 2026: मान्सूनची आगेकूच सुरू असताना यंदा मान्सून लवकर दाखल होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता, परंतु हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार 28 मेपर्यंत केरळमध्ये मुसळधार पाऊस नाही होणार.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : नागरिक सध्या वाढत्या उष्म्याने हैराण झाले असताना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नैऋत्य मोसमी पाऊस यंदा लवकर दाखल होणार आहे. हवामान विभागाने केरळमध्ये मान्सून 26 मे रोजीच दाखल होणार असल्याची माहिती दिली होती. पण या मान्सूनला सध्या दोन दिवस उशीर होईल असा अंदाज आहे. त्यामुळे राज्यात मान्सूनसाठी जूनची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचा अंदाज आहे.

    28 मे ते 3 जून दरम्यान मान्सून

    अंदामान आणि निकोबार बेटांवर मान्सीन 16 मे रोजीच दाखल झाला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसगरातून हे वारे हळूहळू पुढे सरकण्याचा अंदाज आहे. दरम्यान, दक्षिण केरळमध्ये आयएमडीने मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला असून राज्यातील उर्वरित भागात यलो अलर्ट जारी केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हवामान विभागाने केरळमध्ये मान्सून 26 मे रोजी दाखल होईल असा अंदाज व्यक्त केला होता. परंतु, राज्यात 28 मे पर्यंत यलो अलर्टच दिला आहे. त्यानंतर केरळमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे यंदा मान्सून 28 मे ते 3 जूनदरम्यान दाखल होण्याची शक्यता आहे.

    Maharashtra TimesMumbai AC Local: ‘हार्बर एसी’ला उदंड प्रतिसाद; पंधरवड्यात प्रवासी संख्या साडेतीन लाखांनजीक, CSMT ते पनवेल प्रवास गारेगार

    येत्या दोन ते तीन दिवसांत नैऋत्य आणि दक्षिण-पूर्व अरबी समुद्राच्या काही भाग, कोमोरिन क्षेत्र, दक्षिण-पूर्व आणि पूर्व मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात नैऋत्य मोसमी पाऊस पुढे जाण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल, असे आयएमडीने रविवारी सांगितले. केरळमधील मान्सून सप्टेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या चार महिन्यांच्या मान्सूनच्या हंगामाची सुरूवात दर्शवतो. त्यामुळे या मान्सूनकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं असतं.

    दरम्यान, सोमवारी मुंबईत ढगाळ वातावरण कायम राहणार आहे. येत्या 24 तासांत मुंबईसह उपनगरात हलका पाऊस होण्याची शक्यता असून कोकणात मेघर्जनेसह पाऊस होईल असा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, वर्धा, अमरावती आणि अकोल्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे.

    उन्हाच्या तडाख्याने 700 वटवाघुळांचा मृत्यू

    दरम्यान, वाढत्या उष्णतामानामुळे सिरोंच तालुक्यातील ७०० वटवाघळांच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटन रविवारी समोर आली. या मृत वटवाघळांचे नमुने तपासणीसाठ पाठविण्यात आली आहे.

    Maharashtra TimesBullet Train: पारसिक डोंगराखाली बुलेट ट्रेनचा बोगदा; कटरहेड घणसोली शाफ्टमध्ये दाखल, ‘अंडरग्राऊंड टनल’चा मार्ग कसा असेल ?

    सिरोंचा येथील जिल्हा परिष शाळेमागील वनविभागाच्या विश्रामगृह परिसरात अनेक वर्षांपासून हजारोंच्या संख्येने वटवाघुळांचे दिसून येतात. दिवसभझाडांच्या फांद्यांवर उलट्या अवस्थेत लटकून विश्रांती घेणारी आणि रात्री अन्नाच्या शोधात बाहेर पडणारी वटवाघुळे वाढता उष्मा सहन करू शकली नाही. गेल्या दोन दिवसांत शेकडो वटवाघुळे झाडाखाली मृत अवस्थेत आढळून आली. काहींच मृतदेह अजूनही झाडांवर लटकलेल्य अवस्थेत आहेत. याविषयीची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा