• Sat. Jun 6th, 2026

    NEET Paper Leak: मनीषा हवालदारच्या CBI चौकशीत धक्कादायक खुलासे; पुण्यातील आणखी एका तज्ज्ञ प्राध्यापिकेचं नाव घेतलं, व्याप्ती वाढली!

    NEET Paper Leak: मनीषा हवालदारच्या CBI चौकशीत धक्कादायक खुलासे; पुण्यातील आणखी एका तज्ज्ञ प्राध्यापिकेचं नाव घेतलं, व्याप्ती वाढली!

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘नीट यूजी २०२६’ पेपरफुटी प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत असून, राष्ट्रीय परीक्षा संस्थेचा (एनटीए) रसायनशास्त्र विषयाचा आणखी एक तज्ज्ञ केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) रडारवर आला आहे. पुण्यात अटक करण्यात आलेली मुख्याध्यापिका मनीषा हवालदार हिच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीनंतर राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या (एनटीए) रसायनशास्त्रातील पॅनेलमधील तज्ज्ञ प्राध्यापिकेची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

    रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि – भौतिकशास्त्र या विषयांचे पेपर फुटल्याचे सीबीआयच्या तपासात समोर आले आहे. भौतिकशास्त्राचा पेपर फोडणाऱ्या मनीषा हवालदारने एका विद्यार्थ्याला भौतिकशास्त्र विषयातील प्रश्न दिल्याची कबुली दिल्याचे सीबीआयने म्हटले आहे. हे प्रश्न त्यांनी भाषांतर किंवा उलट भाषांतर (रिव्हर्स ट्रान्सलेशन) करून तयार केले होते. विशेष म्हणजे, ही माहिती एनटीए पॅनेलशी संबंधित असलेल्या रसायनशास्त्र विषयाच्या एका तज्ज्ञाच्या सांगण्यावरून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्याचेही त्यांनी मान्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

    अनेक तज्ज्ञांची चौकशी
    ‘नीट-यूजी २०२६’ पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने ‘एनटीए’ शी संबंधित इतर तज्ज्ञांचाही तपास सुरू केला आहे. प्रश्नपत्रिका तयार करणे, भाषांतर, रिव्हर्स ट्रान्सलेशन आणि मॉडरेशन प्रक्रियेत सहभागी झालेल्या काही तज्ज्ञांना पुण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. सीबीआयच्या पथकाने संबंधितांकडे अनेक तास चौकशी करून त्यांच्या मोबाइल संपर्क, परीक्षा प्रक्रियेदरम्यानची भूमिका; तसेच आरोपींशी असलेले संबंध याबाबत माहिती घेतली. प्राथमिक चौकशीनंतर काहींना सोडून देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

    ‘पेपरफुटी’चे जाळे किती मोठे ?
    राजस्थानमध्ये ‘नीट’ परीक्षेपूर्वी काही विद्यार्थ्यांकडे संशयास्पद प्रश्नसंच आढळल्याची माहिती आधीच समोर आली होती. त्यानंतर सीबीआयने या विषयात तपास सुरू केला. त्यांचा तपास राजस्थानातून सुरू होऊन पुणे, लातूरपर्यंत पोहोचला आहे. सीबीआय अधिकाऱ्यांना आतापर्यंतच्या तपासात प्रश्नपत्रिका तयार करणे, भाषांतर, प्रिंटिंग, डिजिटल ट्रान्सफर आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे अशा अनेक टप्प्यांमध्ये गळती झाल्याचा संशय आहे.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed