• Sun. Jun 14th, 2026

    Pune Crime: पुण्यातील ५३ वर्षीय व्यक्तीची महिलेशी ओळख, नंतर सगळंच गमावलं; तब्बल सात कोटींची फसवणूक

    Pune Crime: पुण्यातील ५३ वर्षीय व्यक्तीची महिलेशी ओळख, नंतर सगळंच गमावलं; तब्बल सात कोटींची फसवणूक

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘डेटिंग ॲप’वरून संपर्कात आलेल्या सायबर चोरट्यांनी कोंढव्यातील ५३ वर्षीय व्यावसायिकाला चलन व्यापारात (करन्सी ट्रेडिंग) मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून सात कोटी सात लाख ६१ हजार ८७६ रुपयांना गंडा घातला. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरोधात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार पुणे सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

    कोंढवा परिसरात राहणाऱ्या ५३ वर्षीय व्यावसायिकाने या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना २० ऑक्टोबर २०२५ ते २६ एप्रिल २०२६ या कालावधीत ऑनलाइन घडली. तक्रारदारांचा भोसरी एमआयडीसी परिसरात वाहनांसाठी लागणारे स्पेअर पार्ट तयार करण्याचा कारखाना आहे. एका ‘डेटिंग ॲप’वरून त्यांची एका महिलेशी ओळख झाली. संबंधित महिलेने त्यांना ‘‘करन्सी ट्रेडिंग’मध्ये गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक फायदा होईल,’ असे सांगितले.

    संकेतस्थळावर गुंतविलेल्या रकमेवर घसघशीत नफा होत असल्याचे निदर्शनास आले. मात्र, पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता, चोरटे वेगवेगळी कारणे देऊन आणखी रक्कम भरण्यास सांगत होते. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर हवालदिल झालेल्या तक्रारदारांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली. पुणे सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक देवकाते तपास करत आहेत.

    मागील काही महिन्यांपासून सायबर गुन्ह्यांचे अनेक प्रकार समोर आले आहेत. यामुळे ज्येष्ठांची आर्थिक फसवणूक झाल्याच्या घटना उघड झाल्या आहेत.

    सायबर चोरट्यांनी तक्रारदारांना समाजमाध्यमातून एका संकेतस्थळाची लिंक पाठवली. त्यावर खाते उघडण्यास सांगितले. त्यानंतर गुंतवणुकीच्या नावाखाली त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे पाठविण्यास सांगितले. त्यानुसार, तक्रारदारांनी टप्प्याटप्प्याने सात कोटी सात लाख ६१ हजार ८७६ रुपये पाठविले.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed