दीपेश मोरे, मुंबई : गेल्या काही दिवसांत मुंबईत सोन्याच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ नोंदवण्यात आली आहे. पायधुनी येथील व्यापाऱ्याकडून दागिने घेऊन तमिळनाडू येथील कंपनीने तब्बल १५ कोटी रुपये दिलेच नसल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे येथे दागिन्यांच्या प्रदर्शनात जव्हेरी बाजारातील व्यापारी संयम मेहता यांची बिंदू सेल्वाकुमार आणि विजय कुमार यांच्याशी ओळख झाली होती. या दोघांनी त्यांची तमिळनाडू येथे ‘अभिस जेमग्लो’ ही कंपनी असल्याचे सांगितले. त्यांना दागिन्यांची गरज असल्याचे सांगत मेहता यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या दागिन्यांची ऑर्डर दिली. मागणीप्रमाणे दागिने दिल्यानंतर त्यांनी मेहता यांना दागिन्यांचे अडीच कोटी रुपये दिले. त्यामुळे मेहता यांचा त्यांच्यावर विश्वास बसला. दोघांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्य मागणीनुसार आणखी सुमारे १० किलो सोन्याचे दागिने देण्यात आले. मात्र, या दागिन्यांच्या बिलापोटी येणारी १५ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम न दिल्याने मेहता यांनी त्यांच्याविरुद्ध पायधुनी पोलिस ठाण्यात तक्रार केली.
अंधेरी एमआयडीसी येथील एक कंपनी दागिन्यांवर हिरे बसविण्याचे काम करते. या कंपनीच्या वतीने दागिने बनविण्यासाठी तमिळनाडू येथील ‘रवी डायमंड’ या कंपनीकडे सोने दिले जाते. दागिने घडविल्यानंतर उरलेले शुद्ध सोने ‘रवी डायमंड’ यांच्या वतीने कंपनीला परत केले जाते. हे सर्व सुरळीत असताना सुमारे ३५० ग्रॅमपेक्षा अधिक वजनाचे सुमारे १५ लाख रुपयांचे शुद्ध सोने ‘रवी डायमंड’ यांनी देण्याचे बाकी ठेवले होते. मागणी करूनही ते मिळत नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.
गुंतवणुकीचा निर्णय अंगलट चुनाभट्टीच्या आयटी इंजिनीअरने सोन्यात गुंतवणुकीचा निर्णय घेतला. त्याची ओळख रोहित सेठ व नभ अंगलवार यांच्याशी झाली. रोहितने आपले जव्हेरी बाजारात दुकान असून, बाजारभावापेक्षा कमी किंमतीत सोने देण्याची बतावणी केली. त्यावर २३ ग्रॅमचे एक सोन्याचे बिस्किट हवे आहे, असे सांगत २ लाख ८५ हजार घेऊन हा तरुण रोहित व नभ यांना भेटला. मात्र, सोने आणून देतो असे सांगत दोघे पैसे घेऊन पसार झाले.
देवाचे दागिने हडप वडाळा येथील एका सोनाराने तेथे विराजमान होणाऱ्या एका सार्वजनिक गणपतीसाठी सुमारे ३० लाख रुपयांचे दागिने बनवले होते. हे दागिने उत्सव कालावधी संपल्यानंतर पुन्हा सोनाराला दिले जात. मात्र, वडाळा येथून शिवाजी पार्क येथे राहण्यास गेल्याने ते दागिने लॉकरमध्ये ठेवतो, असे गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर देवाच्या अंगावर हे दागिने घातले जात नसल्याचे सोनाराला कळले. याबाबत विचारणा केली असता पदाधिकाऱ्यांनी आधी चोरीला गेल्याचे सांगितले आणि पोलिसांत तक्रार करताच चोराने दागिने आणून दिल्याचे सांगितले. सोनाराने हे दागिने मागितले असता पदाधिकारी केवळ उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने त्यांच्या विरोधात रफी अहमद किडवाई मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साडेपाच कोटींच्या सोन्यावर डल्ला
चारकोप परिसरात असलेल्या एका दागिने बनविण्याच्या कारखान्यातून सुमारे साडेपाच कोटी रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. कारखान्यात काम करणाऱ्या तीन सुरक्षारक्षकांनी या कोट्यवधी रुपयांच्या सोन्यावर डल्ला मारल्याचा संशय आहे. दागिने गायब झाल्यापासून हे तिन्ही सुरक्षारक्षक कामावर येत नसल्याने मालकाने त्यांच्याविरुद्ध चारकोप पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा