Cockroach Janta Party : देशभरात सध्या कॉकरोच जनता पार्टीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर नवीन पक्ष स्थापना, पक्षचिन्ह, पक्षनाव यासाठी नेमकी प्रक्रिया काय आहे? हे जाणून घेऊया.
चिन्हाची मागणी करु शकतो?
या पार्श्वभूमीवर आपण देशात नवीन पक्ष स्थापन करण्यासाठी, त्या पक्षाचं चिन्ह ठरवण्यासाठी नेमकी प्रक्रिया काय आहे? निवडणूक आयोग पक्षाचं चिन्ह कसं जारी करतं? पक्ष कोणत्याही निवडणूक चिन्हाची मागणी करू शकतो का? असे प्रश्न सतत सर्वसामान्यांच्या मनात येत असतात. त्यामुळे नवीन पक्ष स्थापन, त्याची नोंदणी, नाव आणि पक्षचिन्ह बनविण्याचं नियम व अटी नेमक्या काय असतात? ते आपण या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
Daund-Manmad Railway: दौंड-मनमाड दुहेरीकरणामुळे प्रवाशांची गैरसोय, सोलापूर मार्गावरील एक्सप्रेसचं वेळापत्रक कोलमडलं, दररोज 3-6 तास विलंब
नवीन पक्षाला कशी मिळते मान्यता ?
जर एखाद्या उमेदवाराला आपला स्वत:चा राजकीय पक्ष स्थापन करायचा असेल, तर त्याची नोंदणी निवडणूक आयोगाकडे करणं बंधनकारक आहे. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951च्या 29Aच्या तरतुदीनुसार राजकीय पक्षांच्या स्थापनेशी संबंधित नियमांचा उल्लेख केलेला आहे. या नियमानुसार राजकीय पक्ष स्थापन करण्यासाठी निवडणूक आयोगाने जारी केलेला अर्ज भरावा लागतो. हा फॉर्म ऑनलाईन भरून त्याचे प्रिंटआऊट आणि अन्य आवश्यक कागदपत्रांसह 30 दिवसात निवडणूक आयोगाकडे पाठवावा लागतो. यासाठी 10 हजार रुपयांचं डिपॉझिट भरावं लागतं, ते याआधी पाच हजार इतकं होतं.
पक्ष स्थापन करण्यासाठी काय अटी पाळाव्या लागतात?
राजकीय पक्ष स्थापन करण्यापूर्वी पक्षाची घटना तयार करावी लागते. ज्यात राजकीय पक्षाचं नाव काय ठेवायचं याचा उल्लेख असतो. ज्यात पक्षाचं काम करण्याची पद्धत काय असेल? पक्षाच्या अध्यक्षाची निवड कशी होणार? असे सर्व मुद्दे पक्षाच्या घटनेत मुद्देसुद मांडलेले असतात. पक्षाच्या महत्त्वाच्या पदांवर नेमलेल्या व्यक्तीची माहिती द्यावी लागेल. तसेच पक्षाच्या घटनेच्या प्रतीवर त्यांचे हस्ताक्षर हवे. कागदपत्रात पक्षांच्या बँक अकाऊंटची सविस्तर माहीती द्यावी लागते.
Abhijeet Dipke : ‘आमचं नाही ऐकलं तर अमेरिकेतही संपवू!’ CJP अध्यक्ष अभिजित दीपकेंना आधी ऑफर दिली; नंतर उघड धमकी, काय घडलं?
खातरजमा करूनच परवानगी
पक्षाचं नाव काय असणार आहे? हे उमेदवाराने स्वत: जरी ठरविले असले तरी त्यावर अंतिम मोहर निवडणूक आयोगाची असते. आयोग हे नाव आधी कोणत्या पक्षानं घेतलेलं तर नाही ना, याची खातरजमा करूनच परवानगी देत असतो. जर आधी असं नाव असेल तर आयोग दुसरं नाव सुचवतो. कोणत्याही पक्षाची स्थापना करण्यासाठी किमान 100 ते कमाल 500 सदस्य एकत्र येणं गरजेचं आहे. ते सदस्य अन्य पक्षांबरोबर जोडलेले नकोत. यासाठी प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं. त्यावर आपण दुसऱ्या कोणत्याही पक्षांशी संलग्न नाही हे शपथपत्रावर लिहून द्याव लागतं.
Crime News : घरी सांगू का तुला ‘पुरुष’ आवडतात! सात महिन्यांपूर्वी मुंबईत गाजलेलं प्रकरण, तरुणाच्या मृत्यूची फाईल पुन्हा उघडली, बेडरुममधलं काळं सत्य समोर
चिन्हाबाबत नियम काय सांगतो?
पक्षांना निवडणूक चिन्ह जारी करण्यासाठी देखील कायदा आहे. 1968 नुसार निवडणूक आयोग पक्षांना चिन्ह जारी करतो. परंतू यासाठी देखील नियम असतात. निवडणूक आयोगाककडे सुमारे 100 हून अधिक चिन्ह आरक्षित असतात. जे कोणत्याही पक्षाला जारी केले जात नाहीत. जेव्हा निवडणूक चिन्हं जारी करण्याची वेळ येते तेव्हा आयोग या राखीव चिन्हांपैकी एक चिन्ह पक्षासाठी जारी करतो. परंतू एखादा पक्ष ठराविक चिन्ह मागणी करतो तेव्हा निवडणूक आयोग विचार करतो. जर ते चिन्ह कोणत्याही पक्षाला दिलेले नसेल तरच त्याचा विचार करण्यात येतो.
