• Tue. Jun 16th, 2026
    NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात अजब योगायोग! पुण्यातून तिसरी ‘मनीषा’ जेरबंद, चक्रावणारा खेळ समोर

    नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यातून तिसऱ्या महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील तिसऱ्या आरोपी महिलेचं नावदेखील मनीषा आहे. त्यामुळे हा एक अजब योगायोग बघायला मिळत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे : नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने आणखी मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने या प्रकरणी आणखी एका प्राध्यापिकेला अटक केल्याची माहिती समोर येत आहे. मनीषा हवलदार असं या महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात पुण्यातून मनीषा नावाने अटक होणारी ही तिसरी महिला आहे. मनीषा हवलदार या फिजिक्सच्या प्राध्यापिका आहेत, अशी माहिती आहे. एनटीएकडे असणाऱ्या फिजिक्सच्या प्रश्नांना मनीषा हवालदार हिला अॅक्सेस होता. तसेच यापूर्वी अटक झालेल्या मनीषा मांढरेला मिळून मनीषा हवालदारने फिजिक्सचे प्रश्न लीक केल्याचा आरोप आहे. ते लीक केलेले सर्व प्रश्न तपासण्यात आले. यावेळी लीक झालेले प्रश्न हे नीटच्या प्रश्न पत्रिकेसोबत तंतोतंत जुळल्याचं तपासात समोर आलं आहे.

    नीट परीक्षेचा पेपर ठरणाऱ्या NTA मध्ये एक्सपर्ट म्हणून मनीषा हवलदार हिचा समावेश होता. पेपर सेट करण्यासाठी विषयाच्या तज्ज्ञ प्राध्यापिका म्हणून तिची नियुक्ती करण्यात आली होती. मनीषा हवलदार पुण्यातील शेठ हिरालाल सराफ प्रशाला येथे कार्यरत होती. फिजिक्स विषयात तज्ज्ञ असणारी मनीषा हवलदार बायोलॉजीची तज्ज्ञ प्राध्यापिका मनीषा मांढरे हिच्या संपर्कात होती. मनीषा मांढरे ही बायोलॉजीची प्राध्यापिका होती. सीबीआयने तिलादेखील अटक केली आहे. त्याआधी ती जिच्यासोबत मिळून पेपर फोडायची त्या ब्युटी पार्लरवाली मनीषा वाघमारे हिलादेखील अटक करण्यात आली आहे. मनीषा हवलदार आणि मनीषा मांढरे या एकमेकांच्या संपर्कात होत्या आणि तिने नीट परीक्षेचे प्रश्न मांढरे हिच्यासोबत शेअर केले होते, अशी माहिती तपासात समोर आल्याची माहिती आहे. त्यामुळे या तिसऱ्या मनीषाला सीबीआयने अटक केली आहे.

    सीबीआयने मनीषाला थेट पुण्यातून ताब्यात घेतलं असून तिची चौकशी सुरू आहे. या चौकशीतून आणखी काही मोठी नावं समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. देशभरात विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या या रॅकेटचा विस्तार किती मोठा आहे, याचाही तपास सुरू आहे.

    आतापर्यंत या प्रकरणी नाशिक, अहिल्यानगर, पुणे, लातूर दिल्ली, जयपूर, गुरुग्राम अशा विविध शहरांमधून आरोपींना अटक करण्यात आली आहे. याआधी दहा जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज पुण्यात फिजिक्सची प्राध्यापिका मनीषा हवालदार हिला अटक करण्यात आली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी ही अकरावी अटक आहे. यामधील सात आरोपी हे महाराष्ट्रातील आहेत आणि चार आरोपी हे बाहेरच्या राज्यातील आहेत.

    या प्रकरणात केमिस्ट्रीचा निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी याला देखील अटक करण्यात आली आहे. तो मनीषा मांढरे हिच्या संपर्कात होता, अशी माहिता तपासात समोर आली आहे. पुण्यात हे दोघे प्राध्यापक आपल्या निवासस्थानी निवडक विद्यार्थ्यांची शिकवणी घ्यायचे अशी माहिती समोर आली आहे. तसेच पी. व्ही. कुलकर्णी हा लातूरच्या खासगी क्लास आरसीसीचा संचालक शिवराज मोटेगावकर याच्याही संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच शिवराज मोटेगालकर यानेदेखील पेपर फोडल्याचं तपासात समोर आलं आहे. त्यामुळे सीबीआयने त्याला देखील अटक केली आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा