• Mon. Sep 7th, 2026

महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या नागपूर आयुक्त पदाची संदीप देशमुख यांनी घेतली शपथ   – महासंवाद

ByMH LIVE NEWS

May 22, 2026
महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या नागपूर आयुक्त पदाची संदीप देशमुख यांनी घेतली शपथ   – महासंवाद

मुंबई, दि. २२ : महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनु कुमार श्रीवास्तव यांनी संदीप जगन्नाथ देशमुख यांना महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या नागपूर आयुक्त पदाची तसेच गोपनीयतेची शपथ दिली.

मंत्रालयासमोरील नवीन प्रशासन भवनाच्या ७ व्या मजल्यावरील महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या कार्यालयात शपथविधी सोहळा संपन्न झाला. यावेळी कोकण विभागाचे आयुक्त बलदेव सिंग, अमरावती विभागाचे आयुक्त अरुण डोंगरे उपस्थित होते. तसेच दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे छत्रपती संभाजीनगर विभागाचे आयुक्त डॉ. किरण जाधव, नाशिक विभागाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी आणि पुणे विभागाचे आयुक्त सुधाकर तेलंग सहभागी झाले होते.

संदीप देशमुख हे अपर आयुक्त तथा विशेष निबंधक सहकारी संस्था (सेवानिवृत्त) म्हणून कार्यरत होते. त्यांच्या प्रदीर्घ प्रशासकीय अनुभवाचा लाभ आयोगाच्या कार्याला होणार असल्याचे मुख्य आयुक्त श्रीवास्तव यावेळी म्हणाले.

जनतेच्या अधिकारांचे संरक्षण करणे, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमच्या अंमलबजावणी संदर्भात क्षत्रीय अधिकाऱ्यांवर देखरेख ठेवणे, त्यांना मार्गदर्शन करणे तसेच कामकाजाचा आढावा घेणे ही राज्य सेवा हक्क आयुक्त पदाची मोठी जबाबदारी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मनु कुमार श्रीवास्तव यांना संदीप जगन्नाथ देशमुख यांना राज्य सेवा हक्क आयुक्त, नागपूर पदाची शपथ देण्यासाठी प्राधिकृत केले होते.

माजी राज्य सेवा हक्क आयुक्त, पुणे दिलीप शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी आयोगाच्या सचिव वैशाली राज चव्हाण उपस्थित होत्या.

००००००

राजू धोत्रे /वि.सं.अ

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed