• Sat. Jun 6th, 2026
    Pune Police : शाब्बास! याला म्हणतात पोलीस! पुणे पोलिसांनी उत्तराखंडमध्ये जावून बिश्नोई गँगच्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या

    पुणे पोलिसांनी ‘AJ’ फर्निचर मॉल फायरिंग प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलिसांनी थेट उत्तराखंडमध्ये जावून बिश्नोई गँगच्या तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी- चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरात खळबळ उडवून देणाऱ्या रावेत येथील ‘AJ’ फर्निचर मॉल गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी कुख्यात आरजू बिश्नोई आणि कुलदीप कशिश गँगशी संबंधित तिघांना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने उत्तराखंडमधून अटक केली आहे. १५ मे रोजी रात्री नऊच्या सुमारास दोन अज्ञात आरोपींनी रावेत येथील ‘AJ’ फर्निचर मॉलवर तब्बल आठ राउंड फायरिंग केली होती. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गोळीबारानंतर आरोपी महाराष्ट्राबाहेर फरार झाले होते.

    या प्रकरणाचा तपास करताना गुंडाविरोधी पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपींचा माग काढला. पोलिसांनी इंदोर, चंदीगड आणि हरिद्वार येथे पाठलाग करत अखेर उत्तराखंडमध्ये तिघांना जेरबंद केले. प्रवीण रामनिवास पंकज, कुलदीप राठी आणि सागर अजय पाल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून महत्त्वाची माहिती मिळवली असून या प्रकरणामागील संपूर्ण कटाचा तपास सुरू आहे.

    दरम्यान, रावेत येथील ‘AJ’ फर्निचर मॉलच्या मालकांकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. मात्र खंडणी देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने मॉलवर गोळीबार केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या कारवाईमुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांना मोठे यश मिळाले असून शहरातील गुन्हेगारी टोळ्यांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. ही कारवाई गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

    आरोपींनी फेसबुक पोस्टमध्ये दिलेली धमकी

    पोलिसांनी आरोपींना पकडण्याआधी आरोपींनी फेसबुक पोस्ट करत धमकी दिली होती. “हा तर फक्त ट्रेलर आहे. पुढच्यावेळी थेट गोळी डोक्यात घालू”, अशा इशारा फेसबुक पोस्टच्या माध्यमातून देण्यात आला होता. बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचा दावा करणाऱ्या शुभम लोणकर याच्या अकाउंटला टॅग करुन याबाबतची धमकी देण्यात आली होती. आरोपींच्या या कृत्याची गंभीर दखल पोलिसांनी घेतली होती. पोलिसांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने लोकेशन ट्रॅक करत आरोपींचा पाठलाग केला. यानंतर योग्य वेळी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

    बिश्नोई गँगने अशाप्रकारे दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याची ही पहिली घटना नाही. याआधीदेखील अशाप्रकारच्या घटना घडल्या आहेत. अभिनेता सलमान खान यालादेखील अनेकदा बिश्नोई गँगकडून टार्गेट करण्यात आलं आहे. बिश्नोई गँगने सलमान खानला जीवे मारण्याची अनेकदा धमकी दिली आहे. तसेच सलमान खानच्या वांद्र्यातील घरावर गोळीबार केल्याचीदेखील घटना घडली होती. एवढंच नाही तर आरोपींनी सलमानच्या पनवेल येथील फॉर्म हाऊसच्या बाहेरही रेकी केल्याची माहिती त्यावेळी समोर आली होती.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा