• Tue. Jun 16th, 2026

    Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीच्या मार्गात विघ्न, ३० जूनची डेडलाइन हुकण्याची शक्यता; सरकार काय निर्णय घेणार?

    Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीच्या मार्गात विघ्न, ३० जूनची डेडलाइन हुकण्याची शक्यता; सरकार काय निर्णय घेणार?

    MLC Election: विधानपरिषद निवडणुकीसाठी महापालिका, नगरपालिका, नगर पंचायत, कटक मंडळे आणि जिल्हा परिषदेचे सदस्य मतदान करणार आहेत.

    देवेंद्र फडणवीस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई: शेतकरी नेत्यांच्या आंदोलनानंतर काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल, असं सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने काल महाराष्ट्र विधानपरिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. २२ जून रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असून २५ जूनपर्यंत हा निवडणूक कार्यक्रम संपणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे शेतकरी कर्जमाफीची डेडलाइन हुकणार की काय, अशी शंका निर्माण झाली आहे.

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातील विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत थेट सर्वसाामन्य मतदारांचा सहभाग नसतो. स्थानिक स्वराज्य सस्थांमध्ये निवडून आलेले लोकप्रतिनिधी या निवडणुकीत मतदान करत असतात. त्यामुळे शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेण्यासाठी ही निवडणूक अडसर ठरणार की नाही, याबाबत संभ्रम आहे. याबाबत राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    सरकारने काय शब्द दिला आहे?

    राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला असून ३० जूनपर्यंत निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. काही दिवसांपूर्वीच याबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, “३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानही देण्यात येईल. कर्जमाफीची तयारी अंतिम टप्प्यात असून या संदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली असून, अधिकची माहिती आल्यानंतर ३० जूनपूर्वी कर्जमाफी केली जाईल,” असं मुख्यमंत्र्‍यांनी म्हटलं होतं.

    विधानपरिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर

    मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकांचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी जाहीर केला. त्यानुसार विधान परिषदेच्या १६ स्थानिक स्वराज्य प्राधिकारी मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी येत्या १८ जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीची मतमोजणी येत्या २२ जूनला होणार आहे. त्याच वेळी नागपूर स्थानिक स्वराज्य प्राधिकारी मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होणार आहे.

    राज्यातील बहुतांश स्थानिक निवडणुका पार पडल्या आहेत. निवडणूक होऊ घातलेल्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांत ७५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त मतदार आहेत. यासंदर्भात राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या निवडणुकांबाबतचा प्रस्ताव केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर केला होता. या प्रस्तावाआधारे निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम सोमवारी घोषित केला.

    दरम्यान, महसूल मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे हे २०२२मध्ये नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून गेले होते. मात्र, २०२४मध्ये विधानसभेवर निवडून आल्यानंतर, त्यांनी विधान परिषदेचा राजीनामा दिला. नागपूरच्या जागेची मुदत १ जानेवारी २०२८ रोजी संपत आहे. त्यामुळे नागपूर पोटनिवडणुकीत निवडून येणाऱ्या उमेदवाराला विधान परिषदेचा जेमतेम दीड वर्षांचा कालावधी मिळणार आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा