• Sun. Jun 14th, 2026

    पिंपरीत नद्यांच्या निधीला सरकरचा नकार; पवना, इंद्रायणीचं पुनरुज्जीवन रखडणार, महापालिका, ‘पीएमआरडीए’ची कोंडी

    पिंपरीत नद्यांच्या निधीला सरकरचा नकार; पवना, इंद्रायणीचं पुनरुज्जीवन रखडणार, महापालिका, ‘पीएमआरडीए’ची कोंडी

    Indrayani River Pollution: पिंपरी-चिंचवड शहरातील पवना नदी जलपर्णीने झाकोळली असून इंद्रायणी नवी फेसाळली आहे त्यात त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी निधी देण्यास राज्य सरकारने नकार दिला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. प्रतिनिधी, पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहराची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या पवना आणि इंद्रायणी नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी आखलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना राज्य सरकारने आर्थिक मदत देण्यास सध्या असमर्थता दर्शविली आहे; त्यामुळे या प्रकल्पासाठी लागणाऱ्या ४० टक्के स्थानिक आर्थिक वाट्याचा संपूर्ण भार आता पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांनाच उचलावा लागणार आहे.

    २० टक्के हिस्सा उचलण्याची मागणी

    केंद्र सरकारच्या ‘नॅशनल रिव्हर कॉन्झर्वेशन’ योजनेअंतर्गत पवना आणि इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्तीचा सविस्तर आराखडा (डीपीआर) तयार करण्यात आला आहे. इंद्रायणी नदी प्रकल्पासाठी एक हजार ७९७ कोटी रुपये, तर पवना नदी प्रकल्पासाठी एक हजार १७१ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला असून, एकूण दोन हजार ९६८ कोटी रुपयांचा हा आराखडा मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकार ६० टक्के निधी देणार असून, उर्वरित ४० टक्के निधी राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी उचलायचा आहे. या ४० टक्क्यांपैकी २० टक्के हिस्सा राज्य सरकारने उचलावा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेने केली होती. त्यासाठी महापालिकेने २९ एप्रिल रोजी नव्याने स्थापन झालेल्या ‘महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणा’कडे प्रस्तावही पाठविला होता. मात्र, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने हा प्रस्ताव फेटाळून लावला असून, सध्या निधी उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले आहे.Maharashtra TimesWater Shortage: यंदा मान्सूनमध्ये नागरिकांवर जलसंकट! राज्यातील धरणांमधील पाणीसाठा ३३.१६ टक्क्यांवर; ‘एल निनो’मुळे चिंता

    सहसचिव रमेश मनाळे यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे, की महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणा’ची स्थापना नुकतीच (२७ एप्रिल) झाली असून, प्राधिकरणासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्याची प्रक्रिया प्राथमिक टप्प्यात आहे. त्यामुळे सध्या आर्थिक हमी देणे शक्य नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. यामुळे आता पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ‘पीएमआरडीए’ला उर्वरित ४० टक्के आर्थिक वाटा संयुक्तपणे उचलावा लागणार आहे. स्थानिक संस्थांवर हा अतिरिक्त भार पडणार असल्याने भविष्यात या प्रकल्पाच्या अंमलबजावणीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

    Maharashtra TimesWeather Alert: केरळमध्ये लवकरच मान्सून धडकणार; मुंबईमध्ये कसं राहणार हवामान? IMD कडून महत्त्वाची माहिती

    ‘एसटीपी प्लांट ‘साठी निधी मिळावा म्हणून अहवाल पाठविला होता. मात्र, राज्य सरकारने सध्या निधी नसल्यानेच सांगून महापालिकेलाच राज्य सरकारच्या वाट्याचा २० टक्के निधी खर्च करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार महापालिका आता ४० टक्के खर्च करणार आहे.
    – संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पर्यावरण विभाग

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा