• Tue. Jun 16th, 2026
    Maharashtra Heatwave: सूर्य कोपला! उष्णतेच्या लाटांचा राज्याला तडाखा, तब्बल 183 तालुक्यांत पारा 45 अंशांपार

    Maharashtra Heatwave: गेल्याच आठवड्यात हा ‘ताप’ केवळ सहा जिल्हे आणि २१ तालुक्यांपुरता मर्यादित होता.

    उष्णतेची लाट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे सामान्य शेतकऱ्यांना फटका बसलेला असतानाच, उष्णतेच्या लाटांचा तडाखा अनेक जिल्ह्यांना बसत आहे. आपत्ती व व्यवस्थापन विभागाच्या अहवालानुसार, राज्यातील तब्बल २२ जिल्हे आणि १८३ तालुक्यांचा पारा ४५ अंश सेल्सिअसपलीकडे पोहोचला आहे.

    राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत यासंदर्भात सादरीकरण करण्यात आले. यात राज्यभरातील तापमानाची बदलती स्थिती, अवकाळी पाऊस आणि वीज कोसळून झालेल्या जीवितहानीबाबत सादरीकरण करण्यात आले. ५ ते १४ मे या कालावधीत ७ मेचा एकमेव अपवाद वगळता दररोज विविध जिल्हे आणि तालुक्यांतील पारा वाढून ४५ अंशांच्या पुढे जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
    Maharashtra TimesBike Taxi: आता रॅपिडो, ओला, उबरची बाईक सेवा बंद होणार? राज्य सरकारचा 24 तासांत मोठा निर्णय
    ११ मे रोजी १६ जिल्ह्यांतील ५१ तालुक्यांत पारा ४५ अंशांपलीकडे पोहोचला होता. त्यापुढील दोन दिवसांत १०६ आणि १८३ तालुक्यांतील तापमान ४५च्या पुढे गेले. दरम्यान, या कालावधीत वीज कोसळून दहा जणांसह २७ प्राणी दगावल्याचीही नोंद आहे.

    राज्यात ३५ टक्के पाणीसाठा
    जलसंपदा विभागानेही राज्यातील उपलब्ध पाणीसाठ्याबाबत सादरीकरण केले. त्यानुसार राज्यातील सहा महसुली विभागातील एकूण तीन हजार २८ धरणांत ५०३.७६ टीएमसी, म्हणजेच क्षमतेच्या ३५ टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत केवळ ३० टक्के पाणीसाठा होता. मोठ्या प्रकल्पांसह मध्यम आणि लघु प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठाही गतवर्षीच्या तुलनेत यंदा जास्त आहे. हीच स्थिती राज्यातील १२ मोठ्या धरणांबाबत आहे. मात्र, यंदा उन्हाची तीव्रता जास्त असून ‘एल निनो’मुळे पाऊस लांबण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे पाणी काटकसरीने वापरण्याचे अधोरेखित करण्यात आले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा