मुंबईत शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात येणार होता. पण त्याआधीच पोलिसांनी राजू शेट्टी यांच्यासह इतर नेत्यांना उचललं होतं. या घटनेवर सत्ताधारी आमदार सदाभाऊ खोत यांनी भूमिका मांडली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : मुंबईत आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात सत्ताधारी वगळता सर्वपक्षीय नेते या आंदोलनात सहभागी होणार होते. पण या आंदोलनापूर्वीच मुंबई पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. पोलिसांनी राजू शेट्टी यांच्यासह विविध नेत्यांचे अक्षरश: हात-पाय धरुन पोलीस व्हॅनमधून नेले होते. पोलिसांच्या या कारवाईवर महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांकडून टीका केली जात होती. यानंतर आमदार सदाभाऊ खोत यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न मस्करीत घ्यायला नको, असं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत. यासोबतच राजू शेट्टी, रासप नेते महादेव जानकर यांना पोलिसांनी ज्या पद्धतीने उचललं त्याची गरज नव्हती, अशी भूमिका सदाभाऊ खोत यांनी मांडली.
सदाभाऊ खोत नेमकं काय म्हणाले?
“जे नेते आंदोलन करत होते, माझे सहकारी राजू शेट्टी असतील, महादेव जानकर असतील, त्यांना या पद्धतीने उचलून नेण्याची गरज आहे असं मला वाटत नव्हतं. मोर्चा अडवला असता, सभेमध्ये रुपांतर झालं असतं, सरकारने चर्चेला निमंत्रण दिलं असतं, तर निश्चित हा प्रश्न चर्चेच्या मार्गातून सुटला असता. मला वाटतं, शेतकऱ्याच्या प्रश्नाला थट्टा मस्करीत घ्यायला लागलो, तर हे राज्याच्या दृष्टीने योग्य आहे, असं मला वाटत नाही”, असं सदाभाऊ खोत म्हणाले.
अमोल कोल्हे यांच्याकडूनही निषेध
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील पोलिसांच्या कारवाईवर टीका केली. “मुंबई येथे माजी खासदार तथा शेतकरी नेते राजू शेट्टी यांना पोलिसांनी अक्षरशः फरफटत नेल्याची दृश्ये चीड आणणारी आहेत. यावर्षी कोकणातील आंबा आणि काजू उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी उत्पादनात जवळपास ८० ते ९० टक्के घट झाली आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आंबा बागायतदारांना प्रति हेक्टरी ५ लाख रुपये आणि काजू उत्पादकांना प्रति हेक्टरी ३ लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. परंतु शासनाने किरकोळ आणि तुटपुंजी रक्कम देऊन त्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत”, अशी टीका अमोल कोल्हे यांनी केली.
“याबाबत शेतकरी सातत्याने शासनाकडे मागणी करीत होते. तसेच गेल्या काही वर्षांत फळगळतीचे प्रमाण वाढले आहे. याबाबत संशोधन होणे गरजेचे आहे, पण याकडे सरकारचे अजिबात लक्ष नाही. दुसरीकडे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठमध्ये ५० टक्के जागा रिक्त असून त्या भरण्याबाबत सरकार काहीही करीत नाही. केवळ प्रधानमंत्री फसल बीमा योजनेचा दावा केला जातो. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, असा ढोल वाजविला जातो पण प्रत्यक्षात आंबा, द्राक्ष अशा पिकांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन दीर्घकालीन आणि शाश्वत उपाययोजनांच्या संदर्भात कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत, ही वस्तुस्थिती आहे”, असं अमोल कोल्हे म्हणाले.
“या विरोधात दाद मागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकरी बांधवांचा आवाज पोलीस कारवाई करून दाबला जातो, ही अतिशय खेदाची बाब आहे. खासदार राजू शेट्टी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईचा त्रिवार निषेध. शेतकरी बांधवांच्या न्याय्य मागण्या मंजूर झाल्याच पाहिजेत, अशी आमची आग्रही मागणी आहे”, अशी भूमिका अमोल कोल्हे यांनी मांडली.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा