पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रजत जयंती समारोहाच्या निमित्ताने ‘नागपूर जलसंवाद-२०२६’ आणि ‘जलक्रांती परिषद’ या दोन कार्यक्रमांचे १७ व १८ मे रोजी आयोजन करण्यात आले होते. जल-सुरक्षेतून शेतकऱ्यांना कसा फायदा होईल आणि जल संवर्धनाचे विविधांगी ‘मॉडेल्स’ यावर यानिमित्ताने चर्चा करण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जलसंवाद कार्यक्रमात बोलत असताना एक शेतकऱ्यानं हातात पोस्टर घेऊन घोषणा द्यायला सुरुवात केली. गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त व्यक्ती होता त्यांनी हातात फलक घेऊन घोषणाबाजी केली. मला नंतर भेटा यावर बोलू असं नितीन गडकरी यांनी मंचावरूनच सांगितलं. मात्र व्यक्ती ऐकत नसल्यानं पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि सभागृहातून बाहेर काढलं.