शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार बच्चू कडू पंढरपूर येथे दर्शनाला गेले असताना एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी साकडं घालणार का असं विचारण्यात आलं.महाराष्ट्रात सर्वे केला तर मुख्यमंत्रिपदासाठी इतर कोणापेक्षाही एकनाथ शिंदे यांना जास्त पसंती मिळेल, असे वक्तव्य बच्चू कडू यांनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर भाजपकडून पहिला पलटवार करण्यात आला आहे. भाजपचे प्रवक्ते शिवराय कुळकर्णींनी बच्चू कडू यांना नौटंकीछाप म्हणत त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे.