Chhatrapati Sambhajinagar News: चिखलठाणा एमआयडीसी परिसरातील रुग्णालयात ओपीडीसह मॉड्युलर ओटीचे उद्घाटन आरोग्यमंत्रीप्रकाश आबिटकर यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आले
ओपीडीचे उद्घाटन
राज्य कामगार विमा सोसायटीच्या चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील रुग्णालयात विविध आधुनिक सुविधांची भर पडत असून, रुग्णालयातील दंतोपचारांचा बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी), मॉड्युलर ओटी तसेच राज्यातील इतर ठिकाणच्या सुविधांचे उद्घाटन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नुकतेच झाले. आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत ओपीडीचे उद्घाटनझाले.
रुग्णांशी संवाद साधण्यात आला
या कार्यक्रमास मुंबई येथील राज्य कामगार विमा सोसायटीचे संचालक (प्रशासन) सोहम वायळ, रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता शिंदे, कामगार नेते विनोद फरकाडे, प्रकाश जाधव, तसेच रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी व विमाधारक लाभार्थी उपस्थित होते. या वेळी आमदार जैस्वाल यांनी रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला भेट देत रुग्णांशी संवाद साधला.
Raj Thackeray On Third Mumbai: ‘तिसरी मुंबई’ नेमकी कुणाच्या फायद्यासाठी ? राज ठाकरे यांचा सरकारला प्रश्न
सुलभ दंत आरोग्य सेवा
तसेच मनुष्यबळ व साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्याचे आश्वासनही दिले. दरम्यान, नवीन दंत ओपीडीच्या माध्यमातून विमाधारक कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना अधिक आधुनिक, दर्जेदार व सुलभ दंत आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे.
Pune News : दुचाकीवरुन पडल्याने हात फ्रॅक्चर, ऑपरेशनवेळी पुण्यात 28 वर्षीय विवाहितेचा मृत्यू, डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप
एकाच वेळी चार रुग्णांवर शस्त्रक्रिया
या ठिकाणी विविध दंतोपचारव प्रक्रिया उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर मॉड्युल ऑपरेशन थिअटर सज्ज झाले असून, या ठिकाणी एकाच वेळी चार रुग्णांवर शस्त्रक्रिया करणे आता शक्य होणारआहे. दुसऱ्या मजल्यावरील जुन्या ओटीत व पहिल्या मजल्यावरील मायनर ओटीत तीन शस्त्रक्रिया होऊ शकतात. त्यामुळे आता एकाच वेळी सात रुग्णांवर शस्त्रक्रिया करणे शक्य झाल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिंदे यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.
