• Thu. Jun 18th, 2026

    Nagpur News: कुटुंब नातेवाईकांच्या लग्नसोहळ्यासाठी आले, पण आनंदाचा क्षण दु:खात बदलला; ९ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

    Nagpur News: कुटुंब नातेवाईकांच्या लग्नसोहळ्यासाठी आले, पण आनंदाचा क्षण दु:खात बदलला; ९ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

    Nagpur Accident: अपघातानंतर चिमुकला बेशुद्ध अवस्थेत पडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

    कुटुंब नातेवाईकांच्या लग्नसोहळ्यासाठी आले, पण आनंदाचा क्षण दु:खात बदलला; ९ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नागपूर : नागपूर जिल्ह्यातील हिंगणा नगरपंचायत क्षेत्रातील धनगरपुरा येथे एका दुर्दैवी अपघातात ९ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगरपुरा परिसरातील ग्रीन जिमजवळ असलेल्या घसरणपट्टीवर खेळताना तोल जाऊन खाली पडल्याने लक्की किशोर मसराम या चिमुकल्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथील किशोर ज्ञानेश्वर मसराम हे आपल्या कुटुंबासह नातेवाईकांच्या लग्नसमारंभासाठी हिंगणा येथील धनगरपुरा परिसरात आले होते. लग्नाच्या आनंदाच्या वातावरणात आलेल्या कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला. गुरुवारी, १५ मे रोजी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास लक्की हा इतर दोन मुलांसोबत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळील ग्रीन जिम परिसरात खेळण्यासाठी गेला होता. खेळताना तो घसरणपट्टीवरून घसरत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो जोरात खाली कोसळला. पडल्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

    घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक आणि नातेवाईकांनी तातडीने लक्कीला उपचारासाठी हिंगणा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. चिमुकल्याच्या मृत्यूची बातमी समजताच मसराम कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. या प्रकरणी हिंगणा पोलीस यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात हा अपघाती मृत्यू असल्याचे समोर आले आहे.

    दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी मुलांसाठी उभारण्यात आलेल्या खेळाच्या साधनांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहेत. ग्रीन जिम आणि उद्यानांमधील खेळाच्या साहित्याची नियमित तपासणी होत आहे का, तसेच सुरक्षेच्या उपाययोजना पुरेशा आहेत का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने सुरक्षेची उपाययोजना करावी, अशी मागणीही नागरिकांकडून केली जात आहे. तसेच पाहुणा म्हणून आलेल्या बालकाचा मृत्यू झाल्याने हिंगणा परिसरात सर्वत्र शोककळा पसरली आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा