Crime News : मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत, विरार फाट्याजवळ कुजलेल्या अवस्थेत बॉडी आढळली होती. बॉडीची विल्हेवाट लावण्यासाठी वापरण्यात आलेला ड्रम हा निळ्या रंगाचा होता. त्यामुळे मार्च २०२५ मधील ‘मेरठ प्रकरणा’ ची तुलना या घटनेशी केली जात आहे. कारण त्या प्रकरणातही पतीची बॉडी लपवण्यासाठी महिलेने अशाच प्रकारच्या ड्रमचा वापर केला होता.
मेरठमधील घटनेशी साम्य
तपास अधिकाऱ्यांच्या मते, ५ एप्रिल रोजी मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत, विरार फाट्याजवळ अरबाजचं शव कुजलेल्या अवस्थेत आढळून आलं होतं. बॉडीची विल्हेवाट लावण्यासाठी वापरण्यात आलेला ड्रम निळ्या रंगाचा होता. त्यामुळे मार्च २०२५ मधील ‘मेरठ प्रकरण’ आणि या घटनेची तुलना केली जात आहे. कारण त्या प्रकरणातही बॉडी लपवण्यासाठी अशाच प्रकारच्या ड्रमचा वापर करण्यात आला होता.
वडिलांची पोलिसात तक्रार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली येथील एका खाजगी संस्थेत काम करणाऱ्या अरबाजने कामाशी संबंधित काही रक्कम आणण्यासाठी ३ एप्रिल रोजी दादरच्या दिशेने प्रवास सुरु केला. मात्र तो घरी परतलाच नाही. काही तासांनंतर अरबाजच्या कुटुंबीयांना काळजी वाटू लागली; त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आणि त्यांच्या शेवटच्या ठिकाण्याविषयीची सविस्तर माहिती पोलिसांना दिली.
Pune Crime : दाढी करुन कपडे बदलले, 160 चं डिजिटल घड्याळ मागवलं, 15 रुपयांच्या टेपने अडकला, पुणे बॉम्ब केसमधील आरोपीचा धक्कादायक हेतू
लास्ट लोकेशन शोधलं
पोलीस अधिकाऱ्यांनी अरबाजच्या सीडीआरची तपासणी केली आणि त्याच्या मोबाईल फोनचं अंतिम ठिकाण वसईत असल्याचं शोधून काढलं. या विश्लेषणातून असंही समोर आलं की, त्याच सुमारास नर्स मेहजबीन शेख हिचा फोनही त्याच परिसरात कार्यरत होता. एका अधिकाऱ्याने ‘पीटीआय’ला सांगितलं, “…त्याच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्याच्या कॉल नोंदींच्या विश्लेषणातून मेहजबीनचा दुवा हाती लागला. अरबाजचे तिच्याशी प्रेमसंबंध होते” यावरुन संशयाची सुई कशाप्रकारे वळली, हे स्पष्ट होतं.
मेहजबीनने यापूर्वी अरबाजला काही रक्कम उसनी दिली होती. नंतर ती परत मिळवण्याचा प्रयत्न केला होता. यातूनच अरबाजकडून आणखी पैसे उकळण्याचा कट रचला गेला असावा, यामध्ये मेहजबीन आणि तिच्या नातेवाईकांचा सहभाग होता, असा पोलिसांचा कयास आहे.
Rohit Pawar | ‘तर पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांचा सत्कार करणार’; रोहित पवार थेट बोलले
एकांत स्थळी बोलवून जीव घेतला
एका अधिकाऱ्याने सांगितले, “अरबाजकडून पैसे उकळण्याच्या उद्देशाने, मेहजबीन आणि तिच्या नातेवाईकांनी त्याला वसई येथील एकांतस्थळी बोलावून घेतले.” त्या एकांत ठिकाणी, हल्ल्यापूर्वी अरबाजचे हात-पाय बांधण्यात आले होते, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहजबीन आणि तिचा नातेवाईक तारिक शेख यांनी अरबाजचा मृत्यू होईपर्यंत त्याला पीव्हीसी पाईप्सने मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर हा गुन्हा लपवण्यासाठी अरबाजची बॉडी एका निळ्या रंगाच्या ड्रममध्ये कोंबून वसई-विरार पट्ट्यातील एका नाल्यात फेकून देण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
Crime News : डार्लिंग, तुझ्यासाठी दोन पेपर फोडलेत, तू मला… प्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे आक्षेपार्ह मागणी; ऑडिओ क्लीप व्हायरल
मेहजबीन आणि पतीला अटक
बॉडी सापडून त्याची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी मेहजबीन आणि तारिक यांची ३ एप्रिल रोजीच्या त्यांच्या ठावठिकाण्याबाबत चौकशी केली. हत्या आणि संबंधित गुन्ह्यांच्या संशयावरुन ७ मे रोजी या दोघांनाही अटक करण्यात आली. मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांनी ‘पीटीआय’ला सांगितले की, मेहजबीनचा पती हसन आणि त्याचा आणखी एक साथीदार मुज्जम तालिब खान हे बेपत्ता असून, त्यांना ‘फरार’ म्हणून घोषित करण्यात आले आहे.
मेरठमधील हत्या प्रकरणापासून एकच फरक
पोलिसांनी सांगितले की, वसईमध्ये वापरलेली पद्धत मेरठच्या निळ्या ड्रम हत्याकांडासारखीच होती. त्याचे कथानकही ड्रम आणि अनैतिक संबंधातील वादाशीच निगडीत होते. मेरठमधील मर्चंट नेव्ही कर्मचारी सौरभ राजपूत यांची हत्या करुन त्यांच्या शरीराचे तुकडे करण्यात आले आणि ते एका निळ्या ड्रममध्ये ठेवण्यात आले, तो नंतर घटनास्थळीच काँक्रीट टाकून सील करण्यात आला होता.
त्यावेळी प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या झाली, यावेळी पतीच्या साथीने प्रियकराची, इतकाच काय तो फरक.
