• Tue. Jun 16th, 2026
    Nashik News : पुण्याहून नाशिकला लग्नाला, आईचं दूध प्यायल्यानंतर चिमुकलीची हालचाल थांबली; चार महिन्याच्या लेकीच्या मृत्यूचं खरं कारण समोर

    Nashik Four Month Old Girl Death : इंदापूर तालुक्यातील गोतंडी येथील काटेकर दाम्पत्य आपल्या चार महिन्यांच्या मुलीसह नातलगांच्या विवाहासाठी बुधवारी सायंकाळी बसने नाशिकला आले होते.

    लग्नात दूध पिल्यानंतर मुलीचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जयेश साबळे, नाशिक : पुणे जिल्ह्यातून नाशिकला एका विवाह सोहळ्यासाठी आलेल्या एका कुटुंबावर काळानं भीषण घाला घातला आहे. अवघ्या चार महिन्यांच्या चिमुकलीचा दूध पिल्यानंतर दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे एकलहरा गेट परिसर आणि नातेवाईकांमध्ये मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

    नेमकी घटना काय?

    मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील गोतंडी येथील रहिवासी शुभम काटेकर हे आपल्या कुटुंबासह नाशिकरोड येथील एकलहरा गेट परिसरात एका नातेवाईकांच्या लग्नासाठी आले होते. 14 मे गुरुवारी रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. पहाटे 4 वाजेच्या सुमारास चिमुकलीची कोणतीही हालचाल होत नसल्याचं वडिलांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने तिला नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी चिमुरडीला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, प्राथमिक वैद्यकीय अहवालानुसार ‘अस्पिरेशन निमोनिया’या आजाराने त्यांच्या लेकीचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी 7:10 वाजता डॉ. पाटील यांनी तपासून तिला मृत घोषित केलं. आनंदाच्या वातावरणात आलेल्या या कुटुंबावर अचानक कोसळलेल्या या दुःखद प्रसंगामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे.
    Maharashtra TimesManoj Jarange : मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला; अंतरवाली सराटीत समाज एकटवणार, मनोज जरांगेंचा सरकारला बेधडक इशारा; उपोषण कधीपासून?
    या घटनेबाबत माहिती मिळताच नाशिकरोड पोलीस ठाण्याचं पथक रुग्णालयात दाखल झालं. प्राथमिक वैद्यकीय अहवालानुसार समोर आलेल्या माहितीनुसार आईचं दूध पिल्यानंतर हे दूध किंवा लाळ ही उलट्या श्वासाद्वारे फुफ्फुसात ओढल्या गेल्यामुळे फुफ्फुसांत याचा संसर्ग झाला. हे पदार्थ श्वसन मार्गात अडकले, त्यामुळे फुफ्फुसात गंभीर जंतूंचा संसर्ग झाला आणि फुफ्फुसांना सूज आल्यानं मृत्यू झाला आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपासी अंमलदार पोलीस हवालदार पवार या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
    Maharashtra TimesNashik News: नाशिकमध्ये ५० ई-बसेसची प्रतीक्षा! केंद्र व राज्याकडून कराराचा मसुदा प्रलंबित; वर्षभरापासून बसेस वेटिंगवर

    ‘अस्पिरेशन निमोनिया’ म्हणजे काय?

    ‘अस्पिरेशन निमोनिया’ म्हणजे अन्न, पाणी किंवा लाळ हे उलट्या श्वासावाटे फुफ्फुसात ओढल्या गेल्यामुळे होणारा फुफुसांचा संसर्ग. जेव्हा हे पदार्थ श्वसन मार्गात अडकतात तेव्हा त्यामुळे फुफुसांमध्ये गंभीर जंतूंचा संसर्ग होतो आणि तिथे सूज येते. यालाच मराठीमध्ये ‘शोषणी फुफ्फुस शोध’ किंवा ‘अस्पिरेशन निमोनिया’ म्हटलं जातं.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा