• Thu. Sep 17th, 2026

डॉ.आनंद नाडकर्णी यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची श्रद्धांजली – महासंवाद

ByMH LIVE NEWS

May 15, 2026
डॉ.आनंद नाडकर्णी यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची श्रद्धांजली – महासंवाद

मुंबई दि. 15: प्रसिद्ध मानसोपचार तज्‍ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या  निधनामुळे मन ओळखणारा एक संवेदनशील विचारवंत आपण गमावला असल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. मानवी मनाचा वेध घेत समाजाला मानसिक आरोग्य, संवेदनशीलता आणि सकारात्मकतेची दिशा देणारा एक अभ्यासू आणि माणुसकी जपणारा आवाज हरपला असल्याचे ते म्हणाले.

डॉ.आनंद नाडकर्णी यांनी मानसोपचाराला केवळ वैद्यकीय उपचारांच्या चौकटीत मर्यादित ठेवले नाही, तर ते समाजजागृतीचे प्रभावी माध्यम बनवले. मानसिक आरोग्याविषयी समाजात असलेला संकोच दूर करून त्यांनी हजारो कुटुंबांना नवसंजीवनी दिली. आयपीच संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मानसिक आरोग्य सेवेला लोकचळवळीचे स्वरूप दिले. ‘आणि महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये हजारो विद्यार्थी, पालक आणि स्वयंसेवकांना त्यांनी प्रेरित केले असेही ते म्हणाले.

पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या स्थापनेतून त्यांनी व्यसनमुक्त समाजासाठी आयुष्यभर योगदान दिले. साहित्य, मानसशास्त्र, समाजकारण आणि माणुसकी यांचा सुंदर संगम म्हणजे डॉ. आनंद नाडकर्णी होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक अभ्यासू, संवेदनशील आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व गमावले आहे, असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed