• Sun. Jun 7th, 2026
    Rupali Chakankar: ‘खरातसोबत कोणतेही आर्थिक व्यवहार नाही, गुवाहाटीला दर्शनाला कुटुंबिय स्वतंत्र गेलो होतो’, चाकणकरांचं स्पष्टीकरण

    Rupali Chakankar ED enquiry: समता पतसंस्था गैरव्यवहार प्रकरणी ईडीने राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची आठ तास चौकशी केली. चौकशीनंतर त्यांनी सर्व आरोप फेटाळत बनावट खाती आणि गुवाहाटी भेटीबाबत माध्यमांशी बोलताना स्पष्ट खुलासा केला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: समता पतसंस्था गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची सुमारे आठ तास चौकशी केली. या चौकशीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना चाकणकर यांनी त्यांचे सर्व आरोप फेटाळून लावले असून, भोंदूबाबा अशोक खरात किंवा संबंधित पतसंस्थेशी आपला कोणताही आर्थिक व्यवहार झाला नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

    ती सर्व बनावट खाती

    प्रतिभा चाकणकर आणि तन्मय चाकणकर यांच्या नावे असलेल्या बँक खात्यांबाबत विचारले असता रुपाली चाकणकर म्हणाल्या, “मी यापूर्वी सुद्धा फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सांगितलं होतं आणि आज देखील आवर्जून सांगते की, समता पतसंस्थेमध्ये प्रतिभा चाकणकर आणि तन्मय चाकणकर यांच्या नावाने जी खाती उघडली गेली, ती पूर्णपणे बनावट आहेत.”त्यांनी पुढे माहिती दिली की, दोघेही कधीही समता पतसंस्थेत गेली नव्हती, त्यांना ती संस्था कुठे आहे हे देखील ठाऊक नाही. “त्या खात्यांचे ओटीपी थेट अशोक खरातकडे जात होते. त्या ठिकाणी या दोघांच्याही सह्या नव्हत्या. केवळ या दोघांचीच नाही, तर माझ्या माहितीनुसार सव्वाशे ते दीडशे लोकांची अशी बनावट खाती उघडण्यात आली आहेत. ज्या व्यक्तींना घरातून चालताही येत नाही, अशांच्या नावावरही खाती काढली गेली आहेत,” असे चाकणकरांनी सांगितले.

    Maharashtra TimesAnand Paranjpe : तब्बल 14 वर्षांनी वर्तुळ पूर्ण होणार; शिवसेनेत ‘आनंद’ येणार? बालेकिल्ल्यात शिंदेंचं बेरजेचं राजकारण

    गुवाहाटी भेटीवर दिले स्पष्टीकरण

    अशोक खरातसोबतच्या गुवाहाटी येथील हॉटेल ‘ब्ल्यू रेडिसन’मधील फोटोंवर स्पष्टीकरण देताना त्या म्हणाल्या, “गुवाहाटीचा जो फोटो समोर आला आहे, त्यामध्ये माझ्या कुटुंबासोबत खरातचे कुटुंब आहे. आम्ही त्यांच्यासोबत प्रवास केलेला नाही. दर्शनासाठी आम्ही पुण्यातून स्वतंत्रपणे गेलो होतो.”

    त्यांनी पुढे नमूद केले की, अनेक क्षेत्रातील मान्यवर खरातला गुरु मानत होते आणि त्याच आध्यात्मिक भावनेतून आम्ही दर्शनासाठी गेलो होतो. “१७ तारखेला त्याला अटक झाल्यानंतर तो आरोपी असल्याचे आपल्या सर्वांना समजले. तोपर्यंत ती केवळ एक प्रामाणिक श्रद्धा होती,” असे त्यांनी म्हटले आहे.

    आर्थिक व्यवहारांचे केले खंडन

    ईडी चौकशीबाबत बोलताना चाकणकरांनी सांगितले की, “आमचा कोणताही आर्थिक व्यवहार खरातशी संबंधित नाही आणि कोणताही जमिनीचा व्यवहार झालेला नाही.” ईडीच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केल्याचे सांगून यापुढेही बोलावलं तर चौकशीला जाऊ, असे म्हटले आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.

    मेन डेस्क
    इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.

    फोटोगॅलरी, वेबस्टोरी
    तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.

    शिक्षण
    सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.

    जाहिरात क्षेत्रात काम
    याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.

    दिग्दर्शन, संगीत
    कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.

    पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित
    दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा