NEET-UG पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून सीबीआयच्या विशेष पथकाने लातूरमध्ये धडक कारवाई केली आहे. पहाटे टाकलेल्या छाप्यात एका निवृत्त प्राध्यापकाला ताब्यात घेण्यात आले असून या कारवाईमुळे शहरातील खासगी शिकवणी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
ऋषिकेश होळीकर, लातूर: नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाने संपूर्ण देश ढवळून निघाला असतानाच, आता या प्रकरणाची पाळेमुळे लातूरमध्ये खोलवर रुजल्याचे स्पष्ट होत आहे. केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर, काल सीबीआयच्या एका विशेष पथकाने लातूर शहरात धडक दिली. अत्यंत गुप्तता पाळत सीबीआयने आज पहाटे एका निवृत्त प्राध्यापकाला ताब्यात घेतले असून, यामुळे लातूरच्या शिक्षण वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
पहाटेच कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयचे पथक कालच लातुरात दाखल झाले होते. त्यांनी शहरात ठिकठिकाणी संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले होते. आज पहाटे एका निवृत्त प्राध्यापकाच्या घरावर छापा टाकत त्यांना ताब्यात घेण्यात आले. या प्राध्यापकाचा ‘नीट’चा पेपर सेट करण्यामध्ये काही अंशी सहभाग असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, या पेपरफुटीत त्यांचा थेट संबंध किती आणि कसा आहे, याबाबत सीबीआयने अद्याप अधिकृत भाष्य केलेले नाही. ताब्यात घेतलेल्या व्यक्तीला नेमके कुठे नेले आणि त्यांची चौकशी कुठे सुरू आहे, याबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे.
खासगी शिकवणी चालकांचे धाबे दणाणले
लातूर हे शिक्षणाचे माहेरघर मानले जाते, मात्र नीट पेपरफुटीचे कनेक्शन लातूरशी जोडले गेल्याने शहराच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. यापूर्वी लातूरच्या एका पालकाने पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. त्यावरून पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी शहर पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांना चौकशीचे आदेश दिले होते. पोलिसांनी लातूरमधील चार बड्या खासगी शिकवणी चालकांचे जबाब नोंदवले असून ते अहवाल पोलीस अधीक्षकांना सादर केले आहेत. सीबीआयने ताब्यात घेतलेली व्यक्ती या चार जणांपैकीच एक आहे की अन्य कोणी, याबाबत अद्याप संभ्रम आहे.
पुढील तपासात मोठी नावे समोर येण्याची शक्यता
लातुरातील एका व्यक्तीला सीबीआयने ताब्यात घेतल्याने शहरातील खासगी शिकवणी क्षेत्रातील बड्या लोकांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणाचा तपास जसा पुढे जाईल, तशी अनेक मोठी नावे आणि रॅकेट समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, सीबीआयच्या या कारवाईमुळे नीट परीक्षेतील गैरप्रकारांविरुद्ध आता कठोर पावले उचलली जात असल्याचे चित्र दिसत आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.
मेन डेस्क इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.
फोटोगॅलरी, वेबस्टोरी तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.
शिक्षण सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.
जाहिरात क्षेत्रात काम याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.
दिग्दर्शन, संगीत कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.
पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा