• Tue. Jun 16th, 2026
    Buldhana News : सनई-चौघड्यांचे सूर, आनंदाच्या वातावरणात दु:खाचं सावट, लाडक्या लेकीच्या लग्नात आक्रित घडलं; मुलीच्या कन्यादानावेळी वडिलांचा करुण अंत

    Buldhana Father Heart Attack during Daughter Wedding : लग्न सोहळा मंगलमय वातावरणात पार पडल्यानंतर मुलीचे कन्यादान करतानाच वधूपित्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. आनंदी वातावरण क्षणात दु:खात बदलले. सिंदखेड राजा तालुक्यातील वर्दडी बुद्रूक येथे १२ मे रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. कुरूमदास कुंडलीक भुतेकर (वय ५०) असे या मृत पित्याचे नाव आहे.

    मुलगी लग्न कन्यादान वडिलांना हृदयविकाराचा झटका(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमोल सराफ, बुलढाणा : सनई चौघड्यांचे सूर, मंगलाष्टकाचे स्वर, डीजेचा दणदणाट आणि आनंदानं उपस्थित असलेले वऱ्हाडी पाहुणे अशा मंगलमय वातावरणात मुलीचा विवाह सोहळा पार पडला. मात्र, बिदाई करण्यापूर्वी कन्यादानावेळी वधू पित्याचा हृदयविकाराने दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं लग्नाचा आनंद क्षणात दुःखात परिवर्तित झाला. नववधू आणि वरासह उपस्थित सर्वांवर शोककळा पसरली. बुलढाणा जिल्ह्यातील वरदडी बुद्रुक येथे मंगळवारी 12 मे रोजी सायंकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. कुरुमदास पुंडलिक भुतेकर (वय 50) असं या वधू पित्याचं नाव आहे.

    नेमकं काय घडलं?

    भुतेकर यांची कन्या नंदिनी हिचा विवाह जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील आर्डा (तोलाजी) येथील रहिवासी प्रदीप महादेव नानोटे यांच्याशी निश्चित झाला होता. आपल्या लाडक्या लेकीचा संसार सुखाचा व्हावा आणि विवाहसोहळा अविस्मरणीय व्हावा यासाठी भुतेकर गेल्या अनेक दिवसांपासून धावपळ करीत होते. त्यांनी स्वतः घरोघरी आणि नात्यागोत्यात जाऊन प्रत्येकाला लग्नाचं आग्रहाचं निमंत्रण दिलं होतं. लग्नाच्या दिवशी मंगळवारी 12 मे रोजी दुपारपर्यंत लग्न घरात प्रचंड उत्साह आणि आनंदाचं वातावरण होतं. दोन्ही बाजूचे पाहुणे आणि वऱ्हाडी मंडळी उपस्थितीत हा विवाह सोहळा अत्यंत आनंदी वातावरणात पार पडला.
    Maharashtra TimesPune News : खरेखुरे देवदूत! पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये टायमर जोडलेली बॉम्बसदृश्य वस्तू, डॉ गायकवाडांना रुग्णांची काळजी, स्वतः हाताने उचलून बॉक्स बाहेर नेला
    दुपारचे मुख्य विधी आणि लग्न लागल्यानंतर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारात वधूची पाठवणी करण्यापूर्वीचा अत्यंत भाऊक आणि महत्त्वाचा असणारा कन्यादान विधी सुरू झाला. सर्व नातेवाईक आणि वऱ्हाडी मंडळी समोर बसली होती. भुतेकर हे धार्मिक विधीनुसार आपली मुलगी नंदिनी हिचे कन्यादान करत असतानाच अचानक भुतेकर यांच्या छातीत तीव्र कळ आली आणि ते बसल्याबसल्या जागीच कोसळले. त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याचं उपस्थितांना लक्षात आलं आणि यानंतर संपूर्ण लग्न मंडपात शोककळा पसरली.

    चार महिन्यांपूर्वी झाली बायपास शस्त्रक्रिया

    कुरूमदास भुतेकर यांच्या आईचे 26 डिसेंबर रोजी निधन झाले. त्याच महिन्यात हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मुलगा विशालचा विवाह 21 एप्रिल रोजी पार पडला. एकवीस दिवसांच्या अंतराने मुलीचा विवाह लावण्यात आला.
    Maharashtra TimesNEET Paper Leak Case : पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट; ‘करिअर काऊन्सिलिंग’च्या नावे विद्यार्थ्यांचं सर्कल, टेलिग्रामवर विशिष्ट पासवर्ड; पेपरची छपाई कुठे झाली?

    शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

    कुरुमदास भुतेकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात काल गुरुवार रोजी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सुना आणि नातवंड असा परिवार आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा