• Sat. Jun 6th, 2026
    Pune News : पुण्यात हडपसरमध्ये नामांकीत हॉस्पिटलच्या टॉयलेटमध्ये बॉम्बसदृश वस्तू

    पुण्यातील हडपसरमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू आढळली आहे. एका हॉस्पिटलच्या टॉयलेटमध्ये ही वस्तू आढळली आहे. संबंधित वस्तू आढळल्यानंतर तातडीने पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांकडून या प्रकरणी आता सखोल तपास केला जात आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे : पुण्यातील हडपसमधील एका रुग्णालयाच्या परिसरात बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याची माहिती मिळताच पोलिसांसह बॉम्ब शोधक आणि नाशक पथक घटनास्थळी दाखल झालं. संबंधित बॉम्बसदृश्य वस्तू पोलीस दुसरीकडे घेऊन गेले आहेत. या घटनेनंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी बोलण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरुवातीला कर्मचाऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. पोलिसांनी सध्या प्रतिक्रिया न देण्यास सांगितल्याचं त्यांनी सांगितलं. पण नेमकं काय घडलं? याबाबत माहिती विचारली असता त्यांनी थोडक्यात याबाबत माहिती दिली.

    “पोलिसांनी आताच मला सांगितलं आहे की, कुणाला बाईट वगैरे देऊ नका. जास्त माहिती नाहीय. सात वाजता मी हॉस्पिटलमध्येच राहत असल्याने चौथ्या मजल्यावरुन ओपीडीसाठी आणि कन्सल्टींगसाठी आलो, तेव्हा मला पहिल्या मजल्यावर मावशींनी मला बोलावलं. तिथल्या बाथरुममध्ये एक वस्तू मला दाखवली. ती वस्तू मला बॉम्बसदृश्य वाटल्यामुळे मी लगेच ती खोक्यामध्ये घातली आणि ओपन मैदानात ठेवली. त्यानंतर मी लगेच पोलिसांना फोन करु माहिती दिली. चार कांड्या होत्या, त्यांना टेप गुंढाळलेला होता. त्यामध्ये घड्याळ होतं. त्या घड्याळवर 7 वाजून 21 मिनिटांची वेळ होती. मी संध्याकाळी सात वाजता ते उचललं होतं”, अशी प्रतिक्रिया रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने दिली.

    हडपसरमध्ये एका सुपर स्पेशालिस्ट खासगी हॉस्पिटलच्या टॉयलेटमध्ये बॉम्बसारखी संशयास्पद वस्तू आढळल्याने एकच गोंधळ उडाला. माहिती मिळताच बॉम्ब शोधक आणि नाशक पथक म्हणजेच बीडीएस तात्काळ घटनास्थळी दाखल झालं. हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही वस्तू आल्यानंतर लगेच पोलिसांना कळवण्यात आलं. त्यानंतर काही वेळासाठी हॉस्पिटल परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांसह नागरिकांमध्येही घबराट पसरली होती. खबरदारी म्हणून परिसरातील हालचालींवर नियंत्रण ठेवण्यात आलं.

    मोठ्या काळजीपूर्वक ती वस्तू ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आली. मात्र ती वस्तू खरोखर बॉम्ब होती की कुणीतरी मुद्दाम ठेवलेली संशयास्पद वस्तू, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान, एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये अशी वस्तू कशी पोहोचली? सुरक्षा व्यवस्था नेमकी किती मजबूत आहे? यावर आता प्रश्न उपस्थित होत आहेत. काही जण बिलाच्या वादातून किंवा वैयक्तिक रागातून हा प्रकार झाला असावा अशी चर्चा करत आहेत.

    सध्या पोलीस हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून, ये-जा करणाऱ्या संशयित व्यक्तींची माहिती गोळा केली जात आहे. या प्रकारामुळे हडपसर परिसरात दिवसभर खळबळ उडालेली पाहायला मिळाली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा