• Sat. Jun 6th, 2026

    PM Modi यांचं खाद्यतेल, पेट्रोल-डिझेल कमी वापरण्याचं, सोने वर्षभर खरेदी न करण्याचं आवाहन, मुख्यमंत्र्याची पहिली प्रतिक्रिया काय?

    PM Modi यांचं खाद्यतेल, पेट्रोल-डिझेल कमी वापरण्याचं, सोने वर्षभर खरेदी न करण्याचं आवाहन, मुख्यमंत्र्याची पहिली प्रतिक्रिया काय?

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या जनतेला पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचं आवाहन केलं आहे. यासोबतच वर्षभर सोनं खरेदी न करण्याचं आवाहन केलं आहे. नरेंद्र मोदी यांच्या या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हैदराबाद येथील जाहीर सभेत देशाच्या नागरिकांना अत्यंत मोलाचं आवाहन केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी देशाच्या जनतेला वर्षभर सोने खरेदी न करण्याचं आवाहन केलं आहे. यासोबतच नरेंद्र मोदी यांनी देशाच्या जनतेला खाद्यतेलाचा वापर कमी करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचं आवाहन मोदींनी केलं आहे. आवश्यक असेल तरच इंधनाचा वापर करण्याचं आवाहन मोदींनी केलं आहे. तसेच जास्त इंधन खर्च होऊ नये म्हणून वर्क फ्रॉम होम करा, सार्वजनिक वाहतुकीचा मार्ग निवडा, असं आवाहन मोदींनी केलं. नरेंद्र मोदी यांनी नैसर्गिक शेती आणि सौरऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करण्याचं आवाहन केलं आहे. डिझेलपंपांचा वापर न करता सौरऊर्जेवर चालणारी पंप वापरण्याचं आवाहन मोदींनी केलं आहे. मोदी यांच्या या आवाहनानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

    “जगात तेल आणि गॅसची कमतरता निर्माण झाली आहे. आपल्या बाजूच्या देशांमध्ये तर इतकी वाईट अवस्था आहे, इंधनाचे दर खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे दर हे 450 रुपये प्रतिलीटर इतके झाले आहेत. तरीही आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या पुरवठ्या साखळीला फरक पडू दिला नाही. आपल्याला तेल, गॅस सर्व मिळत आहे. पण आपण या त्रासाला समजू शकलो नाहीत आणि त्याचा वापर चांगल्याप्रकारे करणार नाहीत तर मला असं वाटतं की आपल्यालाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे सांगितलं आहे त्याची संपूर्ण नागरिकांनी अंमलबजावणी करावी”, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

    देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

    “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे सांगितले आहे ते अतिशय योग्य आहे. आपल्याला कल्पना आहे, खूप मोठ्या प्रमाणात अमेरिका, इस्त्रायल आणि इराणच्या युद्धामुळे जगामध्ये तेल आणि गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. जगात अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरु आहे. पाकिस्तान सारख्या देशात पेट्रोल मिळत नाही आणि जिथे मिळतोय तिथे त्याचा भाव 450 रुपये केला आहे. अशाही परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भारतात तेल आणि गॅस उपलब्ध होत आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    “अशावेळी आपण त्याचा योग्य उपयोग केला नाही, आपण त्याचा मोठ्या प्रमाणात नाश केला, अधिकचा उपयोग केला तर आपल्यालाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आवश्यकतेनुसारच उपयोग करण्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं आहे ते सर्वांनी पाळावं, असं आमचं आवाहन आहे”, अशी महत्त्वाची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा