• Sun. Jun 7th, 2026
    Pune Crime : इमारतीच्या बाल्कनीत लोखंडी ग्रिलला लटकल्या, पतीने हात पकडून वाचवण्याचा प्रयत्न केला, पुण्यात महिलेनं स्वत:ला संपवलं; तीन लेकरं पोरके

    Pune Talegaon Dabhade VTP Urban Life Society Woman Ends Life : पुण्यातील तळेगाव दाभाडे येथून एक मोठी घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेनं सोसायटीच्या आठव्या मजल्यावरुन उडी मारुन आपल्या आयुष्याची दोर कापली आहे.

    व्हीटीपी अर्बन लाइफ सोसायटी महिला आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी-चिंचवड : पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे परिसरात एका विवाहित महिलेने आठव्या मजल्यावरून उडी घेऊन आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कातवी येथील व्हीटीपी अर्बन लाइफ सोसायटीमध्ये काल शनिवारी दुपारी ही घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रतिभा मनीष शंकर (वय 34) असं आयुष्य संपवलेल्या महिलेचं नाव आहे. त्या पती आणि तीन मुलांसह सोसायटीमध्ये वास्तव्यास होत्या.

    नेमकी घटना काय?

    मिळालेल्या माहितीनुसार, काल शनिवारी दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास प्रतिभा शंकर यांनी त्यांच्या राहत्या घराच्या बाल्कनीत जाऊन अचानक टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. त्या बाल्कनीच्या कट्ट्यावर चढल्या त्यानंतर त्या लोखंडी ग्रीलला लटकल्या होत्या. हा प्रकार लक्षात येताच त्यांच्या पतीने धाव घेत त्यांचा हात पकडून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. काही क्षणांसाठी त्यांनी पत्नीला धरून ठेवलं होतं. मात्र, परिस्थिती हाताबाहेर गेल्यानं काही सेकंदात त्यांचा हात सुटला आणि प्रतिभा शंकर या थेट आठव्या मजल्यावरून खाली कोसळल्या.
    Maharashtra TimesSangli News : भावाचा नादच खुळा! दहावीत सर्व विषयांत 35 मार्क्स, गावात बॅनरबाजी; सांगलीत सोशल मीडियावर गजूभाईचीच चर्चा

    तीन मुलांचं आईचं छत्र हरपलं

    या घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. आवाज ऐकून सोसायटीतील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांना तातडीनं जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केलं. घटनेनंतर शंकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सोसायटी परिसरात शोककळा पसरली आहे. प्रतिभा शंकर यांना तीन लहान मुलं असल्याचं सांगितलं जात आहे. आईच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर आणि मुलांवर मोठा मानसिक आघात झाला आहे.
    Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar News : माती खचल्यानं विहिरीत कोसळले, ढिगाऱ्याखाली बापासह दोन्ही लेक दबले गेले, तिघांचा करुण अंत; माऊलीचा आक्रोश

    कौटुंबिक वादातून निर्णय?

    याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला असून पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर पार्थिव त्यांच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आलं. प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक वादातून त्यांनी असं टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. या घटनेमुळे तळेगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा