• Sat. Jun 6th, 2026

    Ashok Kharat Case : ‘समोर आलेलं प्रकरण 1 टक्के सुद्धा नाही, बडे लोक अडकले, पैशांचं रॅकेट’, रोहित पवारांचा आरोपांचा बॉम्ब

    Ashok Kharat Case : ‘समोर आलेलं प्रकरण 1 टक्के सुद्धा नाही, बडे लोक अडकले, पैशांचं रॅकेट’, रोहित पवारांचा आरोपांचा बॉम्ब

    अशोक खरात प्रकरणात अनेक मोठे नेते, अधिकारी आणि व्यावसायिक अडकल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे. तसेच या प्रकरणातून नाव वगळण्यात यावे यासाठी मोठे आर्थिक रॅकेट सुरु असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात खळबळजनक दावा केला आहे. अशोक खरात प्रकरणात अनेक मोठे नेते, अधिकारी आणि व्यवसायिक असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे. तसेच या प्रकरणातून आपले नाव वगळले जावे यासाठी पैशांचं खूप मोठं रॅकेट काम करत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. या रॅकेटमधून आपलं नाव निघावं यासाठी एक ट्रिक वापरली जात असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. रोहित पवार यांच्या या आरोपांमुळे प्रकरणाची व्याप्ती आणखी कितीतरी पटीने मोठी असेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण आतापर्यंत जे समोर आलं आहे ते 1 टक्के सुद्धा नाही. त्यापेक्षाही भीषण हे प्रकरण असल्याचा दावा रोहित पवार यांचा आहे. यामुळे या प्रकरणाबाबतचा सस्पेन्स आणखी वाढला आहे.

    रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

    “भोंदू खरात प्रकरणात अनेक मोठे नेते, अधिकारी, व्यावसायिक अडकले आहेत. त्या प्रकरणातील 1 टक्के सत्य देखील समोर आलेले नाही. समोर जे काही आले आहे ते केवळ छोटे मासे आहेत. यामध्ये अनेक मोठे मासे देखील आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात काळा अध्याय म्हणून हे प्रकरण नोंद होणार आहे. या प्रकरणाच्या तपासातून सुटका करून घेण्यासाठी किंवा नाव बाजूला काढण्यासाठी एक मोठे आर्थिक रॅकेट काम करत असल्याची माहिती समजत आहे. मोठमोठ्या रकमा घेऊन अनेकांना यातून अलगद बाहेर काढले जात आहे”, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. “ज्यांना या प्रकरणातून बाहेर काढायचे आहे त्यांना भोंदू विरोधात फसवणूक केल्याची तक्रार करायला सांगितले जाते आणि या प्रकरणातून बाहेर काढले जाते, अशी ही पद्धती असल्याची माहिती आहे. या माहितीची शहानिशा करून गृहमंत्री महोदयांनी योग्य ती कारवाई करावी, ही विनंती”, असं रोहित पवार यांनीम्हटलं आहेत.

    रुपाली चाकणकर यांची सहा तास चौकशी

    राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची आज या प्रकरणी सखोल चौकशी झाली. अशोक खरात याचे प्रकरण समोर आल्यानंतर त्याचे रुपाली चाकणकर यांच्यासोबतचे विविध कार्यक्रमांमधील फोटो समोर आले होते. यामुळे रुपाली चाकणकर यांचीदेखील चौकशी व्हावी, अशी मागणी केली जात होती. याबाबतच्या सर्व आरोपांच्या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांची सविस्तर चौकशी पार पडली. या प्रकरणाचा सखोल तपास करणाऱ्या एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी रुपाली चाकणकर यांची चौकशी केली. तब्बल सहा तास ही चौकशी चालली.

    रुपाली चाकणकर चौकशीसाठी नाशिकमध्ये दाखल झाल्या तेव्हा त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. आपण एसआयटीच्या सर्व प्रश्नांना उत्तर देऊ. तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करु, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या होत्या. पण सहा तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर रुपाली चाकणकर बाहेर पडल्या तेव्हा त्यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया न देता गाडीत बसून निघून जाणं पसंत केलं. त्यामुळे चौकशीत नेमकं काय प्रश्न विचारले, कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, ते अद्याप समजू शकलेलं नाही. दुसरीकडे रोहित पवारांनी नवा दावा केल्याने या प्रकरणाबाबत आता नव्या घडामोडी घडणार का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा