Airoli-Katai Naka Corridor: एमएमआरडीए विकसित करत असलेला ऐरोली ते काटई नाका कॉरिडोर 12.71 किमी लांब आहे. यामुळे कल्याण-डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई, मुंबई आणि बदलापूरपर्यंत प्रवाशांना फायदा होणार आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नवी मुंबई: कल्याण-डोंबिवली आणि ठाण्यावरून नवी मुंबईपर्यंतचा प्रवास आता सोपा होणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील ऐरोली काटई नाका मार्गाचा दुसरा टप्पा पूर्ण झाला असून यामुळे प्रवासात 40 मिनिटांपर्यंत वेळ वाचणार आहे. MMRDA या प्रकल्पावर काम करत असून त्यांनी याबद्दल गुरूवारी माहिती दिली. तसेच, मार्गाच्या पहिल्या टप्प्याचंही काम पूर्ण होत असून लवकरच संपूर्ण मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे.
3 टप्प्यांमध्ये काम
ऐरोली, मुंब्रा आणि काटई नाक्याला जोडणारा मार्ग 12.71 किमी लांब आहे. या हाय स्पीड कॉरिडोरमुळे मार्गांवरील वाहतूक कोंडी कमी होणार असून प्रवासी आणि मालावहतुकीच्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. MMRDA या प्रकल्पाचं काम एकूण 3 टप्प्यांमध्ये करत आहे. त्यापैकी दुसऱ्या टप्प्याचं काम पूर्ण झालं आहे, पहिल्याचं पूर्ण होत आलं असून तिसऱ्या टप्प्याचं काम अद्याप सुरू आहे. या मार्गामुळे प्रमुख विकास केंद्रांमधील संपर्क अधिक मजबूत होऊन राज्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे.
या मार्गावरील पहिला आणि दुसरा टप्पा 2026च्या अखेरीस वाहतुकीसाठी खुला होणार आहे. दरम्यान, तिसऱ्या टप्प्यासह संपूर्ण मार्ग ऑक्टोबर 2028पर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. डिसेंबरपर्यंत पहिला, दुसरा टप्पा सुरू होईल. यामुळे कल्याण-डोंबिवली परिसरामधून नवी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या वेळेत 35-40 मिनिटांची बचत होणार आहे. दरम्यान, प्रवासाचे अंतर तब्बल 7-8 किमीने कमी होईल. त्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
या नव्या मार्गामुळे कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ,विठ्ठलवाडी आणि बदलापूरसारख्या वेगाने वाढणाऱ्या प्रदेशांना जोडणार आहे. यामुळे मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यापर्यंत प्रवास सुस्साट होणार आहे. म्हापे, कल्याण फाटा आणि शिळफाट्यासारख्या वाहतूक कोंडीच्या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कसा आहे मार्ग?
ऐरोली-काटई नाका मार्गावर उन्नत मार्गांसह दोन मुख्य बोगद्यांचा समावेश आहे. प्रत्येक बोगदा 1.69 किमी लांब असून तीन पदरी असणार आहे. प्रत्येक बोगद्यामध्ये एक आपत्कालिन लेन देखील असेल. या मार्गावरील पहिला भाग ठाणे-बेलापूर मार्गाला राष्ट्रीय महामार्ग 4 शी जोडणार आहे. हा भाग 3.43 किमी लांब आहे. दुसरा भाग ऐरोली पुलापासून ठाणे-बेलापूर मार्गापर्यंत बांधला आहे. हा भाग 2.57 किमी लांब आहे. येत्या दशकात वाढणाऱ्या वाहतूक कोंडीचा विचार करूनच हा मार्ग तयार करण्यात आला आहे.
Pune News: पुण्याला आणखी एक महामार्ग मिळणार! ‘नेरळ-शिरूर महामार्गा’ला सरकारची मान्यता; मुंबई-अहिल्यानगर थेट प्रवास शक्य
कसा होणार फायदा?
मार्गावरील उन्नत भागावर प्रवेश करण्यासाठी रॅम्प दिवा-शिळ रोड, काटई जंक्शन आणि काटई नाका बदलापूर मार्गावर उपलब्ध असतील. या मार्गामुळे ऐरोलीतील अंतर्गत मार्ग, ठाणे-बेलापूर मार्ग, म्हापे, शिळफाटा रोड, कल्याण फाटा (राष्ट्रीय महामार्ग -04) आणि कल्याण-शिळ मार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा