• Sun. Sep 6th, 2026
Bacchu Kadu : अतिक्रमण हटवणारे अधिकारी अफझल खानापेक्षा कमी नाही, बच्चू कडू संतापले

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

छत्रपती संभाजीनगर शहरातील गजानन महाराज मंदिर परिसरात महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईदरम्यान गोरगरीब विक्रेत्यांच्या माठाचे नुकसान करण्यात आलं. या कारवाईत दिव्यांग महिला अर्चना पारखे मडक्यांचे छोटेसे दुकान जेसीबीद्वारे जमीनदोस्त करण्यात आले. आपल्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन उद्ध्वस्त झाल्याने ती महिला भावनिक होऊन फुटलेली मडकी गोळा करतानाचा तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. दिव्यांग भगिनी अर्चना पारखे हिच्या भेटीसाठी शिवसेना नेते बच्चूभाऊ कडू यांनी आज त्यांच्या भेटीसाठी धाव घेतली. दरम्यान अतिक्रमणग्रस्तांनी त्यांची बाजू बच्चू कडू यांच्या समोर मांडली. बच्चू कडू यांनी संबंधित घटनेची माहिती घेत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच दिव्यांग आणि गोरगरीबांवर होणारा अन्याय थांबवण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed