Ahilyanagar Vikhe Patil on Mamata Banerjee : ‘अशा किती ममता बॅनर्जी आल्या तरी देश वाकणार नाही’, मंत्री विखेंनी घणाघात केलाय. घुसखोरी, धर्मांतर, जलजीवन घोटाळा आणि चारा संकटावर विखेंनी एकाचवेळी हल्लाबोल केलाय.
राधाकृष्ण विखे पाटील ऑन ममता बॅनर्जी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अनिकेत यादव, अहिल्यानगर : पश्चिम बंगालमधील सत्तांतरानंतर राज्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधत राजकीय वातावरण चांगलेच तापवले आहे. ‘बांगलादेशी घुसखोरीमुळे पश्चिम बंगाल अस्वस्थ झाले होते. जनतेने ममता बॅनर्जी यांचे सरकार उखडून फेकत जंगलराज संपवले’, असा घणाघात करत ‘अशा किती ममता बॅनर्जी आल्या तरी देशाची राज्यघटना आणि लोकशाही अधिक मजबूत आहे’, असे ठणकावत विखेंनी विरोधकांना थेट इशारा दिला. भाजपच्या विजयाचा उल्लेख करताना विखे म्हणाले, ‘देशविरोधी आणि घुसखोरीला खतपाणी घालणाऱ्या शक्तींना जनता आता स्वीकारणार नाही. पश्चिम बंगालमध्ये जनतेने दिलेला कौल हा राष्ट्रहिताचा विजय आहे’.
एमआयएम आणि सिमीचे संबंध तपासा
नाशिकमधील गाजत असलेल्या धर्मांतर प्रकरणावरूनही मंत्री विखे यांनी तीव्र प्रतिक्रिया देत एमआयएमवर गंभीर आरोप केले. ‘धर्मांतर प्रकरणातील मुख्य सूत्रधार निदा खान हिला पोलिसांनी संभाजीनगरमधून अटक केली असून, ती मागील 40 दिवसांपासून फरार होती. पोलीस तपासात एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांनी तिला लपण्यासाठी मदत केल्याची माहिती समोर आल्याचा दावा विखेंनी केला. संभाजीनगर हे पूर्वी सिमी या अतिरेकी संघटनेचे केंद्र म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे एमआयएमचे काही लोक सिमीशी संबंधित आहेत का, याची सरकारने गंभीर चौकशी केली पाहिजे’, अशी मागणी करत विखेंनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली. Pune Crime: पिंपरी-चिंचवडमध्ये एकतर्फी प्रेमाचा भयंकर शेवट; आधी प्रियकराने तरुणीला संपवायचा प्रयत्न केला, पण नंतर त्याचाच अंत!
जिल्ह्याबाहेर चारा जाणार नाही
अहिल्यानगर जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने महत्त्वाची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्याबाहेर चारा निर्यातीवर निर्बंध घालण्याचा इशारा देत विखे पाटील यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. ‘ज्या भागात पाणी उपलब्ध आहे, त्या शेतकऱ्यांना मोफत बी-बियाणे देऊन चारा उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या टंचाईची परिस्थिती नसली तरी भविष्यात संकट निर्माण झाल्यास प्रशासन सज्ज आहे’, असे त्यांनी स्पष्ट केले. Nanded Crime : ‘तू मला खूप आवडतेस, माझ्यासोबत आली नाहीतर…’; भावाकडून बहिणीचा छळ, बदनामी झाल्यानं विवाहितेचं टोकाचं पाऊल
जलजीवन मिशनची अक्षरशः वाट लावली
‘जलजीवन मिशन योजनेतील कथित भ्रष्टाचार आणि निकृष्ट कामांवरूनही विखे पाटील यांनी संताप व्यक्त केला. ठराविक ठेकेदारांनी मनमानी पद्धतीने कामे केली. काही गावांत पाणीच उपलब्ध नसताना योजना राबवण्यात आल्या, तर काही ठिकाणी पाणी असूनही नागरिकांना थेंबभर पाणी मिळत नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला. अहिल्यानगर जिल्ह्यातील जल जीवन मिशनबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्याचे सांगत त्यांनी लवकरच पाणीपुरवठा विभागाच्या सचिवांसोबत आढावा बैठक घेणार असल्याचे जाहीर केले. जल जीवन मिशन योजनेची अक्षरशः अवस्था झाली आहे. दोषींना सोडले जाणार नाही’, असा इशाराही त्यांनी दिला.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा