• Sun. Jun 7th, 2026
    Nilesh Lanke : प्रकृती बिघडली, पुण्यातील रुग्णालयात दाखल, निलेश लंके यांचं काळजी न करण्याचं आवाहन

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर अहिल्यानगर येथे उपचार सुरु होते. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आता त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अनिकेत यादव, अहिल्यानगर : अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले आहे. १ मे रोजी तामिळनाडूमधील जिंजी किल्ल्यावर त्यांच्या नेतृत्वाखाली गड स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. त्यामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. तेथून परत आल्यानंतर काही दिवसांत त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यावर त्यांनी अहिल्यानगरमध्ये उपचार घेतले. मात्र फारसा फरक पडला नसल्याने त्यांना पुण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. फारसे काळजी करण्याचे कारण नसल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, निलेश लंके यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. स्वतः खासदार लंके यांनी प्रकृती स्थिर असल्याचे सांगत कार्यकर्ते आणि नागरिकांना काळजी न करण्याचे आवाहन केले आहे.

    तामिळनाडू येथील जिंजी गडावर 1 मे रोजी आयोजित गड संवर्धन मोहिमेत खासदार निलेश लंके यांनी तब्बल सात ते आठ तास प्रत्यक्ष श्रमदान करत स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला होता. त्यानंतर सततचे दौरे, कार्यक्रम, जनसंपर्कासाठी सुरू असलेली अविरत धावपळ आणि वाढत्या उन्हाचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने सुरुवातीला अहिल्यानगरमध्ये उपचार सुरू होते. मात्र, प्रकृती अधिक खालावल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना तातडीने पुण्यात हलवण्यात आले.

    ‘काळजी करू नये’, निलेश लंके यांचं आवाहन

    दरम्यान, खासदार निलेश लंके यांनी स्वतः आपल्या प्रकृतीबाबत प्रतिक्रिया देत समर्थकांना दिलासा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, सततचे कार्यक्रम, नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी करावी लागणारी अविश्रांत धावपळ आणि यावर्षीच्या उन्हाचा कहर यामुळे गेल्या दोन-चार दिवसांपासून मला बरं वाटत नव्हतं. त्यामुळे दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. पुढील उपचारासाठी आज मी रुबी हॉस्पिटल, पुणे येथे दाखल झालो आहे. मात्र माझी तब्येत स्थिर असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही दिवस सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे. आपल्या सदिच्छा, शुभेच्छा आणि आशीर्वादाचे बळ माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे काळजी करू नये, मी लवकरच पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईन.

    निलेश लंके यांच्या या प्रतिक्रियेनंतर समर्थकांमध्ये काही प्रमाणात दिलासा व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पुण्याकडे रवाना होताना डॉक्टरांची विशेष टीम त्यांच्यासोबत असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. राजकीयदृष्ट्या अत्यंत सक्रिय आणि जनसंपर्कासाठी ओळख असलेले खासदार निलेश लंके अचानक आजारी पडल्याने अहिल्यानगरसह राज्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा