Satara NCP: राज्यसभा खासदार नितीन पाटील यांच्यासमवेत झालेल्या स्नेह भोजनावेळी पक्ष प्रवेशाबाबत त्यांची प्राथमिक चर्चाही झाली आहे.
शरद पवारांच्या शिलेदाराची अजितदादांच्या खासदारासोबत बैठक; ‘तुतारी’ची साथ सोडणार? लवकरच पक्षप्रवेश होण्याची शक्यता(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुधीर पाटील, सातारा : महाविकास आघाडीतील नेत्यांची सत्तेच्या वर्तुळात जाण्यासाठीची धडपड काही थांबता थांबेना. औंध संस्थानच्या राणी गायत्रीदेवी भाजपच्या वाटेवर असतानाच आता पालीच्या खंडोबा देवस्थानचे मुख्य मानकरी तथा कराड पंचायत समितीचे माजी सभापती देवराज पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारीची साथ सोडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. झेडपी निवडणुकीच्या आधीच त्यांनी कराड तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून राष्ट्रवादीचे राज्यसभा खासदार नितीन पाटील यांच्यासोबत त्यांची बैठक देखील झाली आहे.
कराड तालुक्यातील पालीचा खंडोबा हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या देवस्थानचे मुख्य मानकरी असलेले देवराज पाटील यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पाल जिल्हा परिषद मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवली. मात्र, त्यांचा भाजप उमेदवाराकडून पराभव झाला. 2007-12 या काळात ते जिल्हा परिषद सदस्य आणि शिक्षण व अर्थ समितीचे सभापती होते. तसेच 2012-17 दरम्यान पहिली अडीच वर्षे त्यांनी कराड पंचायत समितीचे सभापती पद देखील भूषविले होते. मात्र, यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांना राजकीय घोडदौड कायम राखता आली नाही.
सातारा जिल्हा परिषदेची यंदाची निवडणूक अनेक अर्थाने गाजली. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी महायुतीतील शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीच्या आधीच युती केली होती. त्यांना कॉंग्रेसबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची देखील साथ होती. पाल देवस्थानचे मानकरी देवराज पाटील यांनी घड्याळ चिन्हावर लढूया, असा आग्रह धरला होता. मात्र, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कराड उत्तरमधील नेते, माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. शरद पवारांच्या पक्षाची कराड तालुक्यात जिल्हा परिषदेची एकही जागा निवडून येऊ शकली नाही. देवराज पाटील देखील पराभूत झाले.
पुरोगामी विचारांचा बालेकिल्ला असलेल्या पाल परिसरात भाजपचे कमळ फुलल्याने देवराज पाटील यांचा गट अस्वस्थ झाला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सत्तेत नसल्याने निधी मिळण्यात अडचणी येणार, हे ओळखून पाल देवस्थानचे मानकरी देवराज पाटील यांनी यशवंत विचारांवरच वाटचाल करणाऱ्या अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तालुकाध्यक्षपदाचा आपण राजीनामा दिला आहे. लवकरच कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचे देवराज पाटील यांनी सांगितले आहे. तर देवराज पाटील यांनी स्नेह भोजन ठेवलं होतं. त्यावेळी विकासकामांच्या बाबतीत आणि राजकीय परिस्थितीवर आमच्यात चर्चा झाल्याचे खासदार नितीन पाटील यांनी कबूल केले आहे. देवराज पाटील हे कोल्हापूर दक्षिणचे माजी कॉंग्रेस आमदार ऋतुराज पाटील यांचे मामा आहेत. त्यांनी तुतारी साथ सोडल्यानंतर शरद पवार गटाला कराड उत्तरमध्ये मोठा धक्का बसणार आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा