Kalyan Lokgram Railway Skywalk : कल्याणच्या लोकग्रामचा रेल्वे पादचारी पूल हा आता तयार झाला असला तरी तो अजूनही रेल्वे प्लॅटफॉर्मला जोडण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रवाशांची अद्यापही गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे गेल्या 8 वर्षांपासून नागरिकांची फरफट होत आहे. ही गैरसोय आणखी किती दिवस होईल? याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
ठाणे : एक सरकार आपले पाच वर्षाचे कार्यकाळ पूर्ण करुन पुन्हा निवडणुका जिंकून सत्तेत येऊ शकतं. पण सर्वसामान्यांसाठी एक साधा पादचारी पूल व्हायला तब्बल आठ वर्षांचा काळ स्थानबद्ध होऊ शकतो, हे आजच्या काळातलं करुण वास्तव आहे. हे वास्तव कल्याणच्या लोकग्रामच्या पादचारी रेल्वे पुलाचं आहे. हा रेल्वे पूल 2018 साली रेल्वे प्रशासानकडून पाडण्यात आला होता. या रेल्वे पादचारी पुलाच्या जागेवर नवा पादचारी पूल होईल, अशी माहिती समोर आली होती. पण या रेल्वे पादचारी पुलाचं काम पूर्ण होण्यासाठी अजूनही सर्वसामान्य नागरिकांना वाट पाहावी लागत आहे. विशेष म्हणजे जवळपास सहा वर्षे हा रेल्वे पादचारी पूल अदृश्य होता. रेल्वे पादचारी पूल आज होईल, उद्या होईल, अशी आशा घेऊन लाखो नागरीक दररोज रेल्वे पूल जिथे जमीनदोस्त करण्यात आला होता त्या जागेवरुन रेल्वे रुळ पार करुन पायपीट करत जात होते. आतादेखील प्रवाशांची तीच अवस्था आहे.
या रेल्वे पादचारी पुलाच्या खाली मालगाड्या ये-जा करतात. पण सहा वर्षे पादचारी पूल नसल्याने नागरिकांना रेल्वे रुळ ओलांडून जावं लागत होतं. तसेच आजही हा पादचारी पूल कोणत्याही प्लॅटफॉर्मला लावण्यात आलेला नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. दररोज लाखो प्रवाशी या पादचारी पुलाच्या खालून रेल्वे रुळ ओलांडून स्टेशनला जातात. या दरम्यान, अनेकदा मालगाडी जाते. त्यामुळे प्रवाशांना मालगाडी जाऊ देण्याची वाट पाहावी लागते. त्यानंतर प्रवासी स्टेशनचा रस्ता धरतात. अनेकदा मालवाहू रेल्वे मध्येच थांबते आणि प्रवाशांचा जाण्याचा मार्ग बंद होतो. अशावेळी प्रवाशांना मालगाडी जावू देण्याची वाट पाहावी लागते. अन्यथा मालगाडीच्या खालून जीव धोक्यात घालून जावं लागतं.
अधिकाऱ्यांची नेमकी प्रतिक्रिया काय?
आम्ही स्कायवॉचे काम कधी होईल, याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. यासाठी आम्ही रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांनी महत्त्वाची माहिती दिली. लोकग्रामचा रेल्वे पादचारी पूल बनला असला तरी अजूनही तो नागरिकांसाठी अपेक्षित असा वापरण्यायोग्य झालेला नाही. हा रेल्वे ब्रिज पुढच्या चार महिन्यात प्लॅटफॉर्म क्रमांक ४ आणि ५, ६ आणि ७ ला जोडला जाणार आहे. प्लॅटफॉर्म १ ए आणि २ व ३ ला हा ब्रिज सध्या तरी जोडणं तांत्रिकृष्ट्या शक्य नसल्याचं त्या अधिकाऱ्यांकडून समजलं.
विशेष म्हणजे पूर्वीचा रेल्वे पादचारी पूल हा मधल्या मोठ्या पादचारी पुलाला जोडला गेला होता. पण हा रेल्वे पादचारी पूल त्या मोठ्या पादचारी पुलाला जोडला जाईल का? असा प्रश्न आम्ही त्यांना विचारला. त्यावर त्यांनी याबाबत आता सांगू शकत नाही. कारण जो मधला मोठा पादचारी पूल आहे त्याचे कंस्ट्रक्शन वेगळे आहे. त्यामुळे नवा रेल्वे पदचारी पूल त्याला जोडता येईल का? ते पाहावं लागेल, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
खरंतर दोन्ही रेल्वे पादचारी पूल जोडले जाणे ही खरंतर प्रवाशांच्या सोयीसाठी खूप गरजेची आहे. कारण त्याने कनेक्टिविटी वाढणार आहे. एका पादचारी पुलावरुन प्रवाशी दुसऱ्या आणि तिसऱ्या पादचारी पुलावर जाऊ शकतील. पण सध्याच्या लोकग्रामच्या पादचारी पुलाच्या कामाची गती पाहता तशी आशा प्रवाशांनी बाळगावा का? असा प्रश्न आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा