Maharashtra Politics : पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल समोर आले. त्यामध्ये ५० हून अधिक मंत्री पराभूत झाले. या निकालांनंतर आता महाराष्ट्रातील महायुती सरकारने मंत्र्यांच्या कामांचा आढावा घेण्याची मोहिम सुरु केल्याचे समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यापूर्वीही मंत्र्यांच्या कामगिरीवर भाष्य केले आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आला आणि भल्याभल्यांची झोप उडाली. या निवडणुकीत तब्बल तीन मुख्यमंत्र्यांना गाशा गुंडाळावा लागलाय, तर ५० हून अधिक मंत्र्यांना जनतेने नाकारलंय. या निकालांचे धक्के आता थेट महाराष्ट्राच्या राजकारणात बसू लागलेत. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार आता फुल ‘अलर्ट मोड’वर आलंय. सुमार कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांची आता मंत्रिमंडळातून गच्छंती होण्याची दाट शक्यता वर्तवली जातेय.
निकालांनी झोप उडाली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत येतानाच मंत्र्यांच्या कामाचं मूल्यमापन होणार असल्याचं सांगितलं होतं. पश्चिम बंगाल, तमिळनाडू आणि केरळच्या निकालांनी महायुतीमधील नेत्यांची झोप उडवली आहे. भाजपशासित राज्यांत असं काही घडलं नसलं तरीही, इतरत्र जनतेने मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवलाय. महाराष्ट्रात अशी वेळ येऊ नये, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार गट कामाला लागला आहे.
कुठे किती मंत्री पराभूत?
पाच राज्यांमधील पराभवाचे आकडे धडकी भरवणारे आहेत. तमिळनाडूत स्टॅलिन सरकारमधील १५ मंत्र्यांना पराभवाचा सामना करवा लागला. पश्चिम बंगालमध्ये तर ममता दीदींच्या मंत्रिमंडळातील २२ मंत्र्यांचा खेळ खल्लास झालाय. केरळमध्ये विजयन जिंकले पण सरकारच्या १३ मंत्र्यांना जनतेनं नाकारलं आहे. ही आकडेवारी महाराष्ट्रातील मंत्र्यांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
Tamil Nadu Politics: थलापती ‘विजय’चा संघर्ष संपलेला नाही, बहुमतासाठी दमछाक, घटनेतील शेवटचा पर्याय झटका ठरु शकतो
२०२९ ला पराभूत व्हायचं नसेल तर..
सध्याच्या महायुती सरकारला लवकरच दोन वर्षे पूर्ण होतील. मंत्रिमंडळात भाजपचे १९, शिंदेंच्या शिवसेनेचे ११ आणि राष्ट्रवादीचे ९ मंत्री आहेत. मंगळवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत या पाच राज्यांच्या निकालांवर खलबतं झाल्याचं समजतंय. आगामी २०२९ च्या निवडणुकीसाठी महायुतीने आतापासूनच कंबर कसली आहे. जे मंत्री कामात चांगले नाहीत किंवा ज्यांच्याबद्दल जनतेत रोष आहे, त्यांना डच्चू मिळणं जवळपास निश्चित मानलं जातंय.
महायुती सावध
थोडक्यात सांगायचं तर, मुख्यमंत्र्यांनी शिंदे सेना आणि राष्ट्रवादीला कामगिरी सुधारण्याचा अल्टिमेटम दिलाय. जनतेत जाऊन काम करा, नाहीतर त्याचा फटका सोसावा लागेल, असाच हा संदेश आहे. पाच राज्यांच्या निकालांनी महायुती सावध झाली आहे. आता मंत्र्यांचा परफॉर्मन्सच त्यांचं भवितव्य ठरवणार आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.
मेन डेस्क इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.
फोटोगॅलरी, वेबस्टोरी तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.
शिक्षण सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.
जाहिरात क्षेत्रात काम याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.
दिग्दर्शन, संगीत कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.
पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा