Solapur Crime News : सोलापुरात वराह पालनाच्या जुन्या वादातून सुरेश श्रीराम या तरुणाला भयानकपणे संपवण्यात आलं आहे. त्याच्यावर भर रस्त्यावर हल्ला केला आणि त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. पाच वर्षांपूर्वीच्या भांडणाचा सूड उगवण्यासाठी सहा जणांनी हा हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
इरफान शेख, सोलापूर: सोलापुरात रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास भर चौकात रस्त्यावर एका तरुणाची निर्घुण हत्या केल्याची घटना घडली आहे. पाच वर्षापूर्वी डुक्कर पालनाच्या व्यवसायात भांडण झाली होती, त्याबाबतची सुनावणी कोर्टात सुरू आहे. याचाच राग मनात धरून रविवारी सोलापूर शहरातील माधव नगर येथील मुख्य रस्त्यावर लाठ्या काठ्या धारदार शस्त्र आणि दगडाने ठेचून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. मारहाण करताना, तोंडावर दगडाने ठेचून मारतानाचे सीसीटीव्ही सोशल मीडियावर वायरल झाले आहेत. सुरेश कृष्णा श्रीराम (वय अंदाजित 42 वर्षे)असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. वराह पालनाच्या व्यवसायातून पाच वर्षापूर्वी सुरेश श्रीराम जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला होता याबाबतची नोंद सोलापूर शहरातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याच केसची सुनावणी सुरू असताना, सुरेशची भर चौकात निर्दयीपणे हत्या करण्यात आली आहे.
पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी या खुनाबाबत अधिकृत माहिती दिली आहे. ह्या करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर आल्याने, त्या आधारे सोलापूर पोलीस संशयित आरोपीचा तपास करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार एकूण सहा संशयित आरोपी आहेत त्यापैकी पाच आरोपी ना पोलिसांनी ताब्यात घेतले असून आणखीन एक संशयित आरोपी फरार आहे.
पाच वर्षापूर्वी भांडणं झाले होते
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेश श्रीराम याचे वराह पालनाचे व्यवसाय आहे. पाच वर्षापूर्वी वराह पालनाच्या व्यवसायातून संशयित आरोपी सोबत मयत सुरेश श्रीराम याचे भांडण झाले होते. सुरेश श्रीराम याने डुक्कर पालनाच्या व्यवसायात संशयित आरोपीच्या डुकरांना विष देऊन मारलं आहे, असा आरोप करत पाच वर्षापूर्वी आरोपींनी सुरेश श्रीराम तरुणाचा हाफ मर्डर केला होता. याची नोंद सोलापूर पोलीस ठाण्यात दाखल आहे.या केसची सुनावणी कोर्टात सुरू असून संशयित आरोपींनी ही केस मागे घे, अन्यथा आम्हाला या खटल्यात शिक्षा होईल, तुला सोडणार नाही अशी धमकी दिली होती.
रक्तरंजीत रविवार
सोलापूर शहरातील सत्तर फूट रोड ते नीलम नगर कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर सुरेश श्रीराम या तरुणाची हत्या करण्यात आली. सहा संशयित आरोपींनी माधव नगर येथे मुख्य चौकात सुरेश श्रीरामवर पाळत ठेवली होती. सुरेश येताच सहा संशयित आरोपी तुटून पडले. भर रस्त्यावर धारदार शस्त्राने लाठ्या काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. जाग्यावरच ठार करण्याच्या उद्देशाने संशयित आरोपींनी सुरेशच्या डोक्यावर दगडाने प्रहार केला. हा रक्तरंजीत खेळ सुरू असताना आजूबाजूची वाहतूक पूर्णपणे थांबली होती. भर चौकात खून होत आहे, एकानेही सोडविण्याचा प्रयत्न केला नाही.
पत्नीचा आक्रोश
भर चौकात सुरेश श्रीराम या तरुणाची हत्या झाली. पतीला मारल्याची माहिती मिळताच सुरेशची पत्नी पळत घटनास्थळी आली. रक्ताच्या थारोळ्यात भर रस्त्यावर सुरेशचा मृतदेह पडला होता. सुरेशची पत्नी मृतदेहा बाजूला बसून किंचाळत होती. काळीज पिळटवून टाकणारा दृश्य कॅमेरात कैद झालं आहे. पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार सहा पैकी पाच संशयितांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.
मेन डेस्क इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.
फोटोगॅलरी, वेबस्टोरी तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.
शिक्षण सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.
जाहिरात क्षेत्रात काम याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.
दिग्दर्शन, संगीत कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.
पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा