Pune Crime: संबंधित तरुणी 28 एप्रिलपासून बेपत्ता होती. तिचा मोबाईल, बॅग आणि इतर वस्तू याच परिसरात सापडल्या होत्या.
सिंहगडावर 28 वर्षीय तरुणी मृतावस्थेत आढळली; थरारक रेस्क्यू ऑपरेशननंतर घटना उघड(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
स्नेहल निमगिरे, पुणे : सिंहगड किल्ल्यावर एक थरारक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तुपखाण्याजवळील बुरुज परिसरात खोल दरीत एका तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. मनीषा धर्मदास गायकवाड (वय 28) असं या तरुणीचे नाव आहे.
अंगावर काटा आणणाऱ्या सिंहगडावरील या ठिकाणी पोहोचणंही अवघड असताना अशा परिस्थितीत रेस्क्यू टीमने जीव धोक्यात घालून ऑपरेशन सुरू केलं. घटनेची माहिती मिळताच हवेली पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. समोर शेकडो फूट खोल, काळजाचा ठोका चुकवणारी दरी होती. खाली काय आहे, याची खात्री नसतानाही टीमने शोध सुरू केला. बुरुजाजवळ काही संशयास्पद खुणा दिसताच सगळ्यांचं लक्ष त्या दिशेने वळलं. याच वेळी रेस्क्यू टीममधील कृष्णा मरगळे यांनी रॅपलिंग करून थेट दरीत उतरण्याचा धाडसी निर्णय घेतला. दोऱ्यांच्या आधाराने, प्रत्येक क्षण जीवघेणा ठरू शकत असताना ते खाली उतरू लागले. वर उभ्या असलेल्या टीमचा श्वास रोखला गेला होता.
काही वेळानंतर खालून आलेला सिग्नल सगळ्यांना हादरवून गेला दरीत एका तरुणीचा मृतदेह आढळला होता. यानंतर सुरू झाला सर्वात कठीण टप्पा. खोल दरीतून मृतदेह वर काढणं हे मोठं आव्हान होतं. तानाजी भोसले, गणेश सपकाळ, संदीप सोलासकर, नारायण जावळकर, संजय चोरगे, उत्तम पिसाळ, संतोष भगत, वैभव भोसले यांच्यासह अनेकांनी एकत्र येत जीवाची पर्वा न करता ही मोहीम पार पाडली. वनविभाग आणि अग्निशमन दलानेही मोलाचं सहकार्य केलं. काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर मृतदेह वर आणण्यात यश आलं. त्यानंतर या घटनेचं गूढ उलगडू लागलं.
प्राथमिक तपासात बुरुजावरून उडी मारून आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, या टोकाच्या निर्णयामागचं कारण अजूनही अज्ञात आहे. सिंहगडाच्या शांततेत घडलेली ही घटना अनेक प्रश्न मागे ठेवून गेली आहे. पोलिसांनी या घटनेच्या तपासाला सुरुवात केली असून यामध्ये काय गोष्टी बाहेर येतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा