Tina Chaudhary Clarification : वरळीतील भाजपच्या मोर्चात मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या टीना चौधरी यांनी आता समोर येऊन स्पष्टीकरण दिले आहे. एका व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी त्यांचं म्हणणं काय आहे, ते सांगितलं आहे. त्यांनी यावेळी आपलं कोणतंही सोशल मीडिया अकाऊंट नसल्याचंही सांगितलं आहे.
‘गिरीश महाजनांनी किमान माझं ऐकलं’; भाजप आंदोलनात राडा घालणारी महिला अखेर समोर, त्यादिवशी झालेल्या प्रकारावर सविस्तर माहिती दिली(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यानंतर भाजपने मोर्चाचं नियोजन केलं होतं. हा मोर्चा वरळीमध्ये आयोजित करण्यात आला होता. या मोर्चाचे नेतृत्व भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन हे करत होते. यावेळी एका महिलेने महाजनांशी हुज्जत घातली होती. त्या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. वाहतूक कोंडी होत असल्याने ही महिला प्रचंड संतापली होती. तिने महाजनांना जाब विचारत त्यांच्या दिशेने हातातली बाटलीही भिरकावल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून येत होते. दरम्यान, या व्हिडिओमधील महिला कोण आहे याचीही प्रचंड उत्सुकता यावेळी अनेकांना लागली होती. तर आता याप्रकणातील महिला पहिल्यांदाच माध्यमांसमोर आली आहे. या महिलेचे नाव टीना चौधरी असे असून तिने त्या दिवशी नक्की घडलं तरी काय होतं याबद्दल सविस्तर भाष्य केलं आहे.
नेमकं काय झालं होतं?
टीना चौधरी यांनी या व्हिडिओमध्ये सांगितले की, “त्या दिवशी मी माझ्या मुलीला म्युझिक क्लासला सोडून परतत होते. एका ठिकाणी माझी गाडी वाहतूक कोंडीत अडकली. मी जवळपास एक तास तिथेच अडकून पडले होते, आणि वाट पाहत होते की हे सगळं कधी सुरळीत होणार? पण खूप वेळ गेल्यानंतरही पोलिसांना विनंती करूनही कोणी प्रतिसाद दिला नाही, तेव्हा माझा संयम सुटला. सोशल मीडियावर मी बाटली भिरकावल्याचा व्हि़डिओही व्हायरल झाला आहे. पण मी पाण्याची बाटली आंदोलकांवर फेकली नव्हती, तर ती जमिनीवर फेकली होती. माझे आजोबा आणि कुटुंबातील 8 जण भारतीय सैन्यात होते. त्यामुळे वर्दी घातलेल्या माणसाने जनतेच्या सेवेसाठी बांधील असावे, असे मी मानते”
माझ्या नावाने राजकारण
दरम्यान, यासर्व प्रकरणानंतर ज्या काही चर्चा आणि राजकारण केलं गेलं त्यावरुन टीना यांनी खडेबोल सुनावत त्यांचं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी सांगितलं की, “कोणीही माझ्या खांद्याचा वापर करुन राजकारण करु नये, अशा परिस्थिती निर्माण होतात त्यामागे कारण असतात राजकीय पक्ष आणि भूमिका घेणारे नेते. त्यामुळे माझ्या नावाचा वापर करु नका.”
“सोशल मीडिया अकाऊंट नाही”
“एवढेच नाही तर या सर्व प्रकरणात मला सोशल मीडियावर खूप ट्रोले केलं गेलं पण माझं स्वतःचं कोणतंही सोशल मीडिया अकाऊंट नाही, पण असं असलं तरी माझ्याबद्दल जे लिहिलं गेलं, जे फोटो बनवले गेले ते सर्व मी पाहिले आहेत, असंही यावेळी टीना चौधरी यांनी स्पष्ट केलं आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.
मेन डेस्क इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.
फोटोगॅलरी, वेबस्टोरी तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.
शिक्षण सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.
जाहिरात क्षेत्रात काम याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.
दिग्दर्शन, संगीत कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.
पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा