• Sun. Jun 14th, 2026

    नाशिक जिल्हा रुग्णालयातील जळीत रुग्ण कक्षाचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते लोकार्पण – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    May 1, 2026
    नाशिक जिल्हा रुग्णालयातील जळीत रुग्ण कक्षाचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते लोकार्पण – महासंवाद

    नाशिक, दि. १ मे (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून शासकीय जिल्हा रुग्णालयात साकारण्यात आलेल्या विस्तारीत जळीत रुग्ण कक्ष टप्पा क्रमांक एक चे लोकार्पण राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज सकाळी करण्यात आले.

    यावेळी खासदार डॉ. शोभा बच्छाव, महापौर हिमगौरी आडके-आहेर, उपमहापौर विलास शिंदे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश शिंपी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीलेश पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

    मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा रुग्णालयातील अत्याधुनिक अति दक्षता विभाग, आपत्कालिन कक्ष व आहार विभागास भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णांशी संवाद साधत त्यांची विचारपूस केली. तसेच त्यांना मिळणाऱ्या आहाराविषयी माहिती घेतली.

    जिल्हा रुग्णालयातील या अत्याधुनिक जळीत रुग्ण कक्षामुळे गंभीर जळीत रुग्णांना  सुरक्षित, स्वच्छ व उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. या मॉड्यूलर जळीत रुग्ण कक्षात संसर्ग नियंत्रणासाठी आवश्यक सामग्री, 5 खाटा, स्वतंत्र आयसोलेशन सुविधा, ड्रेसिंग रुम, अत्याधुनिक उपचार साधने उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
    सद्य:स्थितीतील जळीत रुग्ण कक्षातील रुग्णांना नव्याने विकसित आधुनिक सुविधा असलेल्या मॉड्यूलर जळीत कक्षात स्थालंतरीत करण्यात येणार आहे. मॉड्यूलर जळीत कक्ष टप्पा क्रमांक दोनच्या आधुनिकीकरणाचे काम तत्काळ सुरु करण्याचे रुग्णालय प्रशासनाचे नियोजन असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शिंपी यांनी यावेळी सांगितले.

    000000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *