Pune-Saswad Road: सध्या पुण्याहून सासवड, सोलापूर, सातारा परिसरात जाण्यासाठी शहरातील अंतर्गत मार्गांवरून प्रवास करावा लागतो. त्यामुळे वाहनांची वर्दळ वाढली आहे. या समस्येवर तोडगा म्हणून कोंढवा ते वाडकी चौक मार्ग बनवण्यात येणार आहे.
पुणे: पुणे-सासवड मार्गावरील कोंडी फोडण्यासाठी कोंढवा ते वडकी चौकापर्यंत 9 किमी लांब मार्ग उभारण्यात येणार आहे. कोंढवा येथील खादी मशीन चौकापासून हा मार्ग सुरू होत असून पुणे महापालिकेकडून हा रस्ता विकसित करण्यात येणार आहे. दक्षिण पुण्यातील कोंडी फोडून रस्त्यांचे जाळे मजबूत करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.
मार्गाची गरज का आहे?
या मार्गाची बांधकाम प्रक्रिया सुरू करण्यासाठी सर्वप्रथम जमिनी सर्वेक्षण करून भौगोलिक मूल्यांकन आणि प्रस्तावित संरेखनाच्या बाजूला असलेल्या मालमत्तांचे तपशीलावर ऑडिट करण्यासाठी सल्लागार एजन्सी नियक्त करेल. पुण्यात नियमित प्रवाशांसाठी कात्रज-कोंढवा रस्त्याचं रुंदीकरण फायेदशीर ठरणार असलं तरी, वाहतुकीच्या दीर्घकालीन व्यवस्थापनासाठी सासवड किंवा सोलापूर रसत्याकडे जाण्यासाठी मार्ग विकसित करणं महत्त्वाचं आहे. या प्रस्तावित 9 किमी लांब मार्गामुळे अवजड आणि व्यावसायिक वाहनांसाठी बायपास म्हणून काम करणार आहे.Amrit Bharat Express: वाराणसी-पुणे, अयोध्या- मुंबई ‘अमृत भारत’ एक्सप्रेस हिरवा झेंडा! संपूर्ण मार्ग, स्थानकं कसे असतील?
सध्या सातारा, सासवड आणि सोलापूर महामार्गांदरम्यान वाहतूक करणाऱ्या वाहनांना शहरातील अरूंद रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. या नव्या मार्गामुळे वाहनांना शहरतील अंतर्गत वाहतूक कोंडीतून प्रवास न करता थेट प्रवास करणं शक्य होणार आहे. त्यामुळे शहारतील अंतर्गत हलक्या वाहनांची वाहतूक आणि शहराबाहेरील अवजड वाहनांच्या वाहतुकीचं विभाजन होणार आहे. कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणासह या नव्या मार्गामुळे शहरातील वाहतूक सुरळीत करण्यास मदत होणार आहे.
काम कधी सुरू होणार?
हा मार्ग Regional Planअंतर्गत या पूर्वीच प्रस्तावित होता. पण अनेक काळापासून मार्ग तयार करण्यात आला नव्हता. पण आता या प्रकल्पासाठी सध्या सविस्तर अहवाल तयार करून लवकरात लवकर हे काम पूर्ण कसं करता येईल याचं नियोजन करण्यात येणार आहे अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Pune Purandar Airport : पुरंदरचे शेतकरी होणार कोट्यधीश! ‘पॅकेज’ ठरले, लवकरच वाटप; विमानतळासाठी शेतकऱ्यांना प्रति एकर किती मोबदला?
काही महिन्यांपासून खादी मशीन चौक आणि कोंढवा परिसरातील मार्गांवर अवजड वाहनांची वाहतूक वाढल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. अनेक वाहनाचालक बोपदेव घाटामार्गे सासवडपर्यंत जातात. त्यामुळे शहरातील मार्गांवर कोंडी वाढते. या मार्गांच्या क्षमतेनुसार ही वाढती वाहतुकीची समस्या हातळणं अशक्य असल्याची माहिती स्थानकांनी दिली आहे. त्यामुळे सोलापूर, सासवड आणि साताऱ्याला जोडणारे सर्व दुवे लवकरात लवकर विकसित करण्याची गरज असल्याचं त्यांनी मागणी केली आहे.
कात्रज-कोंढवा या सध्याच्या रस्त्यावरील जमीन मालकांना पुढील महिन्याभरात नुकसान भरपाईची रक्कम निश्चित केली जाईल, अशी पीएमसीची अपेक्षा आहे. दरम्यान, ज्या भागात आधीच नागरी संस्थेचा ताबा आहे, अशा भागात रुंदीकरणाच्या कामाला गती देण्यात आली आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा