Banaras to Pune Amrit Bharat: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 28 एप्रिल रोजी मुंबई आणि पुणे यांना अयोध्या व वारणसीशी जोडणाऱ्या दोन अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. या गाड्या राम मंदिर आणि काशी विश्वनाथ यांसारख्या प्रमुख धार्मिक स्थळांना जोडतील.
वृत्तसंस्था, वाराणसी: वाराणसी ते पुणे (हडपसर) आणि अयोध्या ते मुंबई (लोकमान्य टिळक टर्मिनस) या दोन नवीन ‘अमृत भारत’ एक्स्प्रेस गाड्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी हिरवा झेंडा दाखवला.
रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अमृत भारत एक्स्प्रेस गाड्या सर्वसामान्य नागरिकांसाठी तयार करण्यात आल्या असून, त्यात आराम, सुविधा आणि परवडणारे दर यांचा समतोल साधण्यात आला आहे. अयोध्या-मुंबई (लोकमान्य टिळक टर्मिनस) अमृत भारत एक्स्प्रेस 12 स्थानकांवर थांबेल. हा प्रवास 28 तासांत पूर्ण होईल. या गाड्यांच्या नियमित वेळापत्रकाची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. अमृत भारत गाड्यांचे भाडे नियमित मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या तुलनेत अंदाजे 15 ते 17 टक्के जास्त आहे.
‘वाराणसी-पुणे’ला एकूण 18 थांबे
वाराणसी ते पुणे (हडपसर) अमृत भारत या गाडीला ज्ञानपूर रोड, प्रयागराज, फतेहपूर, गोविंदपुरी, ओरई, वीरांगना, लक्ष्मीबाई झाशी, बीना, राणी कमापती, नर्मदापुरस, इटारसी, हरदा, खांडवा, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर, दौंड आणि हडपसर अशी 18 स्थानके आहेत. हा प्रवास सुमारे 30 तासांत पूर्ण होईल.
गाडी क्रमांक 02531 मंगळवारी दुपारी 4.45 वाजता वाराणसी येथून रवाना झाली. हा मार्ग सांस्कृतिक राजधानी काशी आणि शैक्षणिक केंद्र पुणे यांच्या दरम्यान प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, व्यावसायिक आणि पर्यटकांसाठी एक महत्त्वाचा दुवा आहे.
अयोध्या धाम – मुंबई (LTT) अमृत भारत एक्सप्रेस
श्री राम मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांसाठी ही नवी अमृत भारत सुरू करण्यात आली आहे. ही ट्रेन क्रमांक 02292 दुपारी 4.45 वाजता अयोध्या धाम येथून सुटली. दुसऱ्या दिवशी रात्री 9.05 वाजता ही ट्रेन एलटीटी येथे दाखल होईल. या ट्रेनला 12 थांबे आहेत.
अयोध्या धाम जंक्शन, सुलतानपूर जंक्शन, प्रतापगढ जंक्शन, प्रयागराज जंक्शन, मानिकपूर जंक्शन, सतना, जबलपूर, इटारसी जंक्शन, भुसावळ जंक्शन, जळगाव, नाशिक रोड, कल्याण जंक्शन, ठाणे, लोकमान्य टिळक टर्मिनस असे थांबे असतील.
Pune News : पुणे स्टेशनवर घसरलेला ‘वंदे भारत’चा डबा अखेर हटवला, रेल्वेसेवा ‘रुळावर’, डायमंड क्रॉसिंगच्या कामामुळे अपघाताचा अंदाज
अमृत भारतचे वैशिष्ट्ये काय?
प्रत्येक अमृत भारत एक्सप्रेस 22 डब्यांची असून सर्व सामान्यांना परवडणाऱ्या किंमतीत प्रवास शक्य होतो. या ट्रेनमध्ये 11 जनरल क्लास अनारक्षित डबे. 8 स्लीपर क्लास डबे, 2 गार्ड व्हॅन आणि एका पॅन्ट्री कारचा समावेश आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा