Pune Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच पुण्यात एक मोठी घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली आहे.
पुणे बाणेर मोलकरीण व्हॉट्सअॅप स्टेटस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
स्नेहल निमगिरे, पुणे : पुण्यातल्या बाणेर परिसरात एकदम फिल्मी वाटावा असा प्रकार घडलाय. घरात कामाला असलेली मोलकरीण आणि घरमालकिणीमध्ये झालेल्या एका छोट्याशा संशयाने तब्बल साडेचौदा लाखांचे दागिने आणि महागडी साडी चोरीचा पर्दाफाश केला आहे. हा सर्व प्रकार सुरू झाला एका साडीपासून, घरातली 20 हजार रुपये किंमतीची सिल्क साडी अचानक गायब झाली. घरमालकिणीला आधी वाटलं की कुठेतरी ठेवली असेल, पण काही दिवसांनी तीच साडी मोलकरणीने नेसून थेट व्हॉट्सॲप स्टेटसवर टाकली, आणि इथेच मालकिणीला संशय आला आणि इथे मोलकरणीचा डाव फसला.
‘अरे ही साडी तर माझीच आहे!’
घरमालकिणीने स्टेटस पाहिलं आणि डोक्यात लगेच ट्यूब पेटली. ‘अरे ही साडी तर माझीच आहे!’ असा विचार येताच तिने मोलकरणीला जाब विचारला. पण तिकडून सरळ उत्तर न देता उडवाउडवीची बोलणी सुरू झाली. इथंच घरमालकिणीला पूर्ण संशय आला आणि तिने लगेच तिला कामावरून काढून टाकलं. पण गोष्ट इथेच थांबली नाही. काही दिवसांनी घरात तपास करताना अजूनच धक्कादायक गोष्टी समोर आल्या. किचनच्या ओट्याखाली पाण्याची बाटली, तेल आणि काही इतर वस्तू सापडल्या. घरमालकिणीने दावा केला की या वस्तू तिथे मुद्दाम ठेवलेल्या असून त्यामागे काळी जादू करण्याचा हेतू आहे. Mumbai-Pune Expressway Missing Link Rule : कारला 100 ते प्रवासी वाहनांना 80 किमी प्रति तास वेगमर्यादा, सरकारकडून नियमावली जारी
‘स्टेटसनेच चोर पकडला’
आता घरमालकिणीचा संशय अजूनच बळावला. तिने थेट बाणेर पोलीस ठाणे गाठलं आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनीही प्रकरण गंभीर घेतलं असून तपास सुरू केला आहे. मोलकरणीने नेमकं किती आणि काय-काय घेतलं, हे शोधण्याचं काम आता पोलिसांच्या हातात आहे. बाणेर परिसरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. ‘स्टेटसनेच चोर पकडला’, अशी भन्नाट कमेंट लोक करत आहेत. घरकाम करणाऱ्यांवर विश्वास ठेवताना थोडी काळजी घ्यावी लागते, हे पुन्हा एकदा या घटनेनं दाखवून दिलं आहे.
IMD Alert : राज्यभरात तापमानाने टोक गाठलं, अशी परिस्थिती किती दिवस राहणार? हवामान विभागाकडून मोठी अपडेट
नाशिक धर्मांतर प्रकरणात थेट ‘मलेशिया’ कनेक्शन
येथील एका बहुराष्ट्रीय कंपनीत समोर आलेल्या धर्मांतर आणि महिला लैंगिक अत्याचार प्रकरणात आता आणखी काही धक्कादायक बाबी समोर येत आहेत. या प्रकरणाला आता आणखी धक्कादायक वळण लागण्याची शक्यता असून प्रकरणाचे धागेदोरे थेट मलेशिया आणि मालेगावपर्यंत पोहोचले असल्याचा दावा विशेष सरकारी वकिलांनी न्यायालयात केला आहे. या आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा उलगडा झाल्ायने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा